एकीकडे इंधनदर कडाडले असतानाच करोनामुळे बाहेरच्या देशांतून सूर्यफूल, तसेच पाम तेलाची आयातही घटल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने दिवाळीपासून खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दिवाळीनंतर खाद्यतेल किलोमागे आठ ते दहा रुपयांनी महागल्याने सर्वसामान्यांचा महिन्याचा आर्थिक ताळेबंद बिघडला आहे.
दिवाळीदरम्यान सोयाबीन तेल १०२ ते १०३ रुपये लिटर होते, त्यात पाच ते सात रुपयांची वाढ झाली असून, ते १०७ ते ११० रुपयांपर्यंत गेले आहे. सूर्यफूल तेलातही किलोमागे दहा रुपयांची वाढ होऊन ते १२० ते १३० रुपयांपर्यंत गेले आहे. सूर्यफूल, तसेच सोयाबीन तेलाच्या पंधरा किलोंच्या डब्यामागे शंभर ते सव्वाशे रुपयांनी वाढ झाली आहे. तेल ही प्रत्येक घरातील अत्याश्यक गरज असल्यामुळे त्यासाठी महिन्याच्या बजेटमधील जास्त पैसे मोजावे लागत असल्याने किचनचा ताळमेळ बिघडला आहे. संगमनेर, धुळे या भागात असलेल्या तेलाच्या घाण्यांमधून नाशिकमध्ये बहुतांश तेल येते. मोठ्या कंपन्यांचे खाद्यतेल मुंबईहून येते. शेंगदाणेही किलोमागे पाच रुपयांनी वधारले असून, ११० ते ११५ रुपयांपर्यंत गेले आहेत.
[23/12, 9:20 PM] gangadhard2011: दिवाळीनंतर गव्हाच्या दरांतही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातून येणारा सिहोर, तसेच स्थानिक गहू दिवाळीत २० ते २२ रुपये होता, तो आता २४ ते २५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. मध्य प्रदेशमधील काही गहू तीस रुपयांपर्यंत गेला आहे.
चहाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचे दरही प्रचंड वाढले आहेत. दिवाळीनंतर किलोमागे ४० ते ५० रुपये वाढ झाल्यामुळे चहाचा तजेला महागला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चहाचे दर वाढतेच आहेत. दिवाळीदरम्यान सव्वाचारशे ते साडेचारशे रुपये किलोदरम्यान असलेला पॅकिंग चहा पाचशे रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गणेशोत्सवात गगनाला भिडलेले कापराचे दर आता काहीसे खाली आले असून, तो हजार ते बाराशे रुपयांवर गेला आहे.
स्थिर दिवाळीदरम्यान डाळींच्या दरांत मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर मागणी काहीशी कमी झाल्याने डाळींचे दर स्थिर आहेत. साखर, पोहे, साबुदाणा, रवा, हरभराडाळ, मूगडाळ आदींच्या दरांतही फारसा फरक पडलेला नाही. पॅकिंग खोबरेल तेल मात्र दोन रुपयांनी महागले आहे. — दिवाळीनंतर तेलाच्या किमती वाढतच आहेत. सध्या सोयाबीनसह सूर्यफूल तेलाच्या दरांत किलोमागे आठ ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. डाळी-साळी मात्र स्थिर आहेत.
कोरोना महामारी आणि महागाईचे संकट असतानाच तोंडावर आलेल्या दसरा दिवाळीची चिंता सर्वसमान्यांना लागली आहे. सणासुदीच्या दिवसांत तेल दर वाढीचा मोठा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची यंदा दिवाळीही अंधारातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्यावेळी हातात पैसे नाहीत, त्यात भर म्हणून वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे
स्वयंपाकासाठी तेलाची गरज असते. त्यामुळे तेलाची खरेदी ही करावीच लागते. तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडून पडलं आहे. सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफुल तेल अशा खाद्यतेलांचे भाव वाढले असून शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिमसाठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी पामतेल जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध होणार नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर खाद्यतेलाच्या भावात देखील मागील आठवड्यात तेलाच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, तेलाच्या दरात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता तेल विकणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून दर्शवली जात आहे.
दरवर्षी सोयाबिनच्या तेलाची आवक ही सप्टेंबरमध्ये होते. मात्र, यावर्षी पारतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते तेलाचे भाव वाढणार असल्याचे संकेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृत्रिम साठा केल्याचाही परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे.
सूर्यफूल तेलाचा (sunflower oil) आधीच बाजार भाव 15 १५ लिटरच्या डब्यामागे 1500 १५०० रुपये इतका होता. तर सध्याचा भाव हा 1700 १७००ते 1800 १८०० रुपये इतका आहे. पाम तेलाचा आधीच बाजार भाव हा एक हजार ते अकराशे रुपये एवढा होता. तर सध्याचा भाव हा 300 तीनशे रुपयांनी वाढला असून पाम तेल हे 1400 १४००ते 1500१५०० रुपये इतके झाले आहे. मात्र, शेंदणा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. शेंदणा तेलाचा आधीच बाजार भाव हा २४०० रुपये इतका होता. मात्र, सध्याचा भाव हा २१००रुपये इतका झाला आहे.
विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत. वाढीव किमतीनुसार १४० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा व्हायला हवी, हे विशेष.
नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत ६४६ रुपये होती. तेव्हा बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा व्हायची. त्यानंतर २ डिसेंबरला सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढून ६९६ रुपयांवर गेले. तेव्हाही ग्राहकांच्या बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा झाली. त्यानंतर १५ डिसेंबरला सिलिंडर पुन्हा ५० रुपयांनी दर वाढले आणि किंमत ७४६ रुपयांवर पोहोचली. त्यानंतर ४०.१० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा झाल्याचे मॅसेज ग्राहकांना येत आहेत. अर्थात सिलिंडरचे दर ६४६ रुपये असताना ४०.१० रुपये सबसिडी, ६९६ रुपयावर गेल्यावरही तेवढीच आणि ७४६ रुपये झाल्यावरही ४०.१० रुपये सबसिडी जमा होत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. सिलिंडरचे दर वाढल्यानंतर सबसिडी वाढीव किमतीच्या प्रमाणात जमा होत असल्याचा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण जास्त सबसिडी का जमा होत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीचे अधिकारी म्हणाले, केवायसीच्या अटी पूर्ण केलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यात तेल कंपन्यांच्या अटीनुसार सबसिडी जमा होते. सिलिंडरच्या किमतीनुसार सबसिडी कमी-जास्त होत असते. डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढूनही सबसिडी का वाढली नाही, यावर भाष्य करता येणार नाही. हे सर्वस्वी तेल कंपन्यांच्या हातात आहे. ज्यांना कमी सबसिडी जमा झाल्याचे मॅसेज आले, त्यांच्या खात्यात पुन्हा सबसिडी जमा होऊ शकते.
विनाअनुदानित सिलिंडरची १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही बँक खात्यात नोव्हेंबरच्या किमतीएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. केंद्र सरकार वाढीव दराचा ग्राहकांना फायदा न देता त्यांच्या खिशातून १०० रुपये जास्तीचे काढत आहे. हे चुकीचे आहे. सरकारने सबसिडी वाढवावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
पूर्वी सिलिंडरचे दर ८०० रुपयांवर गेले होते तेव्हा २०० रुपयांपर्यंत सबसिडी जमा व्हायची. आता ७४६ रुपयांवर दर गेल्यानंतरही बँक खात्यात ४०.१० रुपयेच सबसिडी जमा झाली आहे. यासंदर्भात वितरक उत्तर देण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना विचारून सांगतो, असे उत्तर मिळाले. सरकारने सिलिंडरच्या दरवाढीसोबतच सबसिडी वाढवावी.
घरगुती सिलिंडरचे दर चार वर्षांत पहिल्यांदा ५०-५० रुपयांनी दोनदा वाढविले आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी असून ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये दररोज वाद होत आहेत. वाढीव दरामुळे ग्राहकांच्या खात्यात १४० रुपयांची सबसिडी जमा होत असल्याचे वितरकाचे मत आहे. पण अजूनही ग्राहकाच्या खात्यात केवळ ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे, हे विशेष. यावर खुलासा करण्याची ग्राहकांची मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरानुसार देशांतर्गत सिलिंडर दराची चढउतार महिन्याच्या अखेरच्या तारखेला मध्यरात्री होते. त्यानुसार वितरक ग्राहकांकडून दर वसूल करतात. नोव्हेंबरमध्ये घरगुती सिलिंडरचे दर ६४६ रुपये होते. १ डिसेंबरच्या मध्यरात्री १४.२ किलो घरगुती सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढविले. सिलिंडर ६९६ रुपयांचे झाल्याचे वृत्त झळकताच ग्राहकांनी ५० रुपये दरवाढ देऊ केली. पण १४ डिसेंबरच्या मध्यरात्री तेल कंपन्यांनी पुन्हा सिलिंडरची ५० रुपयांनी दरवाढ केली. याची कल्पना ग्राहकांना नव्हती. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्या ग्राहकांना १३ आणि १४ तारखेला ६९६ रुपये सिलिंडरच्या दराचे मॅसेज मोबाईलवर आले. त्यानंतर १४ च्या मध्यरात्री दरवाढ झाल्याने ग्राहकांना ७४६ रुपये दराने सिलिंडरचा पुरवठा होऊ लागला. पण ग्राहकांना पूर्वीच ६९६ रुपये किमतीचा मॅसेज आल्याने ग्राहकांचा गैरसमज झाला आणि डिलिव्हरी बॉयसोबत वाद होऊ लागले. ५० रुपये जास्तचे का आकारत आहेत, अशी विचारण ग्राहक डिलिव्हरी बॉयला करू लागले. अनेकांनी वितरकाला फोन लावून विचारणा केली. अशा स्थितीत कंपन्यांनी पुन्हा ५० रुपये सिलिंडरचे दर वाढविल्याचे समजावून सांगताना वितरकाला त्रास होत आहे.
ऑक्टोबर महिन्याचा घाऊक महागाईचा दर जाहीर झाला आहे. दर महा आधारावर जाहीर होणार घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्कांनी वाढून १.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसऱ्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
अन्नपदार्थांसाठीचा डब्ल्यूपीआय घटून ५.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हा दर ६.९२ टक्के होता. ऑक्टोबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांचे मूल्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. सप्टेंबरमध्ये १.६१ टक्क्यांच्या तुलनेत वाढून २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अन्नपदार्थांच्या घाऊक बाजारातील महागाईच्या दरामध्ये घट झाल्यानंतरही घाऊक आणि किरकोळ मूल्याच्या दृष्टीने चिंता कायम आहे. तज्ज्ञांच्या मते अन्नपदार्थांचा महागाई दर आता भाजीपाला आणि फळांशिवाय अन्य वस्तूंवर पडू लागला आहे. अशा परिस्थितीत पुढच्या दिवसांमध्ये याचा प्रभाव व्याज दरांवर पडू शकतो.
सातत्याने वाढणारा महागाई निर्देशांक आणि घसरते व्याजदर यामुळे देशातील घरगुती गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी कपात झाल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
कोविड-१९ महामारीमुळे देशातील पारिवारिक आर्थिक असुरक्षितता वाढत आहे. कौटुंबिक पातळीवरील बचतीचा चलन, बँक ठेवी, कर्ज रोखे, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, विमा आणि अल्पबचत योजना यांच्याशी थेट संबंध आहे. व्याजदरातील घसरणीमुळे गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. महागाई वाढल्यास परिवाराच्या हातात उरणारी रोख रक्कम कमी होते. त्याचाही थेट परिणाम गुंतवणुकीवर होतो.
सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ७.३४ टक्के होता. सलग सहाव्या महिन्यात तो रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा अधिक
राहिला.
एसबीआयच्या मुदत ठेवींचा व्याजदर ४.९ टक्के होता. महागाई-समायोजित वास्तव व्याजदर -२.२७ झालेला आहे. व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात रोख झाल्यामुळे बँकांना व्याजदर कमी करावे लागले आहेत.
राज्यभर कोरोनाचा कहर सुरू असतानाच त्यात महाभाईची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो व शेवगा शेंगांसह फरसबी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. सप्टेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये २६ ते ३६ रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी ६० ते ७० रुपयांवर गेली असून किरकोळमध्ये हे दर ८० ते १०० रुपये झाले आहेत. बीट, फ्लॉवर, शेवगा शेंग, वाटाणा, आले या सर्वांचे दर वाढले आहेत. एपीएमसीमध्ये कांद्याचे दर २८ ते ४० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमधील दर ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत.
राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक घटली आहे. डाळींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पुरेसा साठा नाही व आयातही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. यामुळे बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत.
सप्टेंबरच्या अखेरीस राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी होत असल्यामुळे दर वाढू लागले असून पुढील काही दिवस
मार्केटमध्ये बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
२३.१२. २०.