कंधार ; प्रतिनिधी
नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून निवडलेले प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी दिनांक 23 रोजी कंधार येथे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक यशपाल भिंगे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात नूतन कार्यकारिणी करून पक्ष बळकट करण्याचे काम चालू आहे .आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून ज्येष्ठांना व युवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन कंधार येथे सत्कार प्रसंगी केले.
यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे ,राष्ट्रवादी युवा माजी जिल्हा अध्यक्ष आनंद चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, संतोष कांगणे आदींची यावेळी उपस्थिती होती