आपलेच अश्रू असतात आई
आपणास छळणारे…..
पापणी ओली झाल्यावर
गालावरुन ओघळणारे…..
नसतो मुळीच थांगपत्ता
तुझ्या त्या अपार कष्टाचा,
त्या अश्रूंनाही फुटतो पाझर
महिमा तुझा लिहिताना.
कसे होणार मोजमाप आई
तुझ्या त्या कष्टाचे,
कोण करणार माप आई
तुझ्या त्या वात्सल्याचे.
बेंबीची नाळ तुझी
बाळासाठीच कापतेस,
नऊ महिन्याच्या प्रवासात तू
किती किती वेदना सोसतेस.
तु वेदनेलाही गिळंकृत करतेस
अन् जन्म देतेस आम्हांला,
कळा सोसूनी लाख आई
तुच दुनीया दाखवतेस आम्हांला.
तुझ्याच चरणी नतमस्तक होतो
तुच माझा देव आई….
आई विना या जगतात
कुणीच कुणाचं नाही….
®कवी,
आत्माराम गरुडे
दिग्रसकर.
भ्रमणध्वनी,
९३५६५७८४७४.
@काव्यांजली@