धर्मापुरी ( प्रतिनिधी प्रा.भगवान आमलापुरे)
येथील कै शं गु महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ टी एल होळंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा सौ एस डी मुंडे होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणित तज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सौ एस डी मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ टी एल होळंबे म्हणाले की गणित तज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांना केवळ ते १३ वर्षे वयाचे असताना गणित विषयाची गोडी लागली. त्यामुळे बाकिच्या विषयात ते नापास होत. त्याचा परिणाम म्हणून त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. कदाचित ते ब्राह्मण असल्याने समुद्र प्रवास आणि परदेश गमन अभद्र मानले जाई. पण ते बाहेर देशात गेले.
शिवाय कदाचित अस्पृश्यता पाळल्याने डबल स्नान करावे लागले. पण त्यांना तेथील वातावरण सुट झाले नाही. ते अवेळी गेले. अगदी कमी म्हणजे ३० – ३२ वर्षाचे आयुष्य जगू शकले. पण त्यांनी या छोट्या आयुष्यात गणिताच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. २०१२ वर्षे हे गणित वर्षे म्हणून पाळले गेले. तेव्हा पासून, डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेंव्हा पासून २२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
शेतकरी दिवसाच्या अनुशंगाने बोलताना ते म्हणाले की गेल्या २६ दिवसापासून पंजाबच्या शेतकऱ्यानी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी पाण्याचा मार खाल्ला आहे. दुधाचे दर पाण्यापेक्षा कमी आहेत. चार टप्प्यात ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. हे योग्य आहे का. असा प्रश्न उपस्थित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एन एस चाटे यांनी केले.