नांदेड ;
जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. या निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 (25,26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत.हे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या http::panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरुन नामनिर्देशन पत्राची प्रिंट काढल्यानंतर आवश्यक त्याठिकाणी स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
या नामनिर्देशन पत्रासोबत आवश्यक कागदपत्रासह http::/panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्या बाबतचे घोषणापत्र आणि मत्ता व दायित्व बाबतचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.या नामनिर्देशन पत्रासोबत पोलीस विभागाच्या चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता राहणार नाही, असे उपजिल्हाधिकारी सामान्य शरद मंडलिक यांनी कळविले आहे.