ऱ्हस्व-दीर्घाचे उच्चारण

कविता वाचताना आक्षरांचे ऱ्हस्व-दीर्घ लिहिल्याप्रमाणे त्यांचे तसे उच्चारण करणेही महत्वाचे आहे. तरच त्या ओळीची/कवितेची लय साधली जाऊन कवितेचा आनंद आपण महत्तम प्रमाणात घेऊ/देऊ शकतो. त्यासाठी ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका टाळून शुद्ध लिहिण्याची सवय हवी.

उदाहरणार्थ –
सुत / सूत,
दिन / दीन,
मिलन / मीलन
दीर्घ अक्षर त्या अक्षरावर थोडा जोर देऊन वाचल्यास ते दीर्घ आहे हे दर्शविता येईल. वाचताना हा ऱ्हस्व-दीर्घातील फरक करून वाचलं पाहिजे, तशी सवय लावून घेतली पाहिजे. सवयीने हे सहज साध्य होतं.

ऱ्हस्व-दीर्घ जसे लिहिले आहेत तसेच उच्चारले गेले तर शब्दाचा अर्थ योग्य लागेल/पोहोचेल आणि ओळीची लयसौंदर्यताही वाढेल.

■■■

Vijay Joshi sir


@ विजय जोशी
डोंबिवली
9892752242

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *