” इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी,”
प्रा. भगवान आमलापूरे यांच्या लेखनीतुन
फुलवळ ता.कंधार जि.नांदेड येथील बाबाराव पाटील बोरगावे यांच्या घरी ( जुने गावठाण, गुरु महाराज गल्ली ) नागेलीची वेल ( विड्याच्या पानांची,खायचे पान ) फुलली, बहरली आहे. विशेष म्हणजे बाबाराव पाटील बोरगावे यांचे एकुलते एक चिरंजीव, पत्रकार ( दै सकाळचे बातमीदार ) धोंडीबा उपाख्य बंडू भाऊ बोरगावे यांच्या सागर ड्रेसेस, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र अर्थात वक्रांगीआणि घरपोच कनेक्ट या त्री – इन – वन फर्मच्या दिपावलीच्या लक्ष्मी पुजनाच्या दिवसी, लक्ष्मी पुजनासाठी स्वतःच्या घरच्याच नागेलीच्या पानांचा ,( विड्याच्या पानांचा ) उपयोग केला आहे.
फुलवळ येथील जेष्ठ नागरिक बाबाराव पाटील बोरगावे यांच्या राहत्या घरी ( गुरु महाराज गल्ली, जुने गावठाण ) नागेलीची वेल फुलली आणि बहरली आहे. सदरील वेली १० – १२ फुट उंच वाढली आहे. तिच्या वाढीचा वेग चालूच आहे. अक्षरशः ती घरावरील स्लँपवर आणि स्लँपवरुन पुन्हा वर – खाली आणि इतरत्रही शेंडे पसरवत आहे. वेलीने अगदी डेरेदार जाळी – जुगळी तयार केली आहे.
नागेलीच्या या पानांचे वैशिष्ट्ये म्हणजे या वेलीच्या पानांचा रंग घट्ट आहे, गडद आहे. त्यामुळे या पानांचा रंग कलकत्ता ( कोलकता ) पानासारखा वाटतो आहे ,दिसतो आहे. लांब आणि लंबगोलाकार पाना ऐवजी या वेलीची पाने गोलाकार आहेत.ही पाने चविष्ट आणि रुचकर पण आहेत.
निरोगी शरीरासाठी अशा वेली आणि असी पाने खूप महत्त्वाचे असतात. असी भावना यशवंतराव ना मंगनाळे, पाणीसांगे यांनी व्यक्त केली.दिपावलीत या पानांचा विडा मलाही खाता आला. त्यामुळे मी ( प्रा भगवान आमलापूरे ) स्वतःला भाग्यवान समजतो.
पत्रकार धोंडिबा बोरगावे ( सकाळ बातमीदार, फुलवळ सर्कल प्रमुख ) यांची दोन मुले ( सौरभ आणि सागर बोरगावे ) बाबा नगर, नांदेड येथे शिक्षणासाठी होते. त्या दरम्यान धोंडिबा बोरगावे यांनी नागेलीच्या पानाचे एक रोपटं आणलं होतं. ते फुलवळमधील आपल्या स्वतःच्या घरी लावले. तीच ही नागेलीची वेल होय. वेलीच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेग पाहून, पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या तोंडी आपसूकच, ” इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी,” ही संतोक्ती येत आहे.
दरम्यान आमचे छोटे मामा सदाशिवअप्पा धों लाटकर ( कलंबर बु. ) ,हल्ली मुक्काम जळकोट, जिल्हा लातूर यांना या विषयावर बोलतं केलं असता, ते म्हणाले की दोन वर्षांपूर्वी पर्यंत कलंबरला पानमळे होते. विशेष म्हणजे २००८ – २०१० पर्यंत म्हणजे जोपर्यंत पाऊस चांगला पडत होता, तोपर्यंत कलंबरला पानमळे होते. नंतर ते पावसासारखंच कमी – कमी होत गेले. नाही म्हटलं तरी पानमळ्याचं काम, दुध – दुप्त्यासारखं किचकटंच ( complicated ) आहे.
पानमळ्यास पाणी मात्र सारखं म्हणजे भरपूर प्रमाणात पाहिजे असतंय. इतर महागाई सारखं या पानांसही भाव चांगला मिळतो. म्हणून शेतकऱ्यांना पानमळा परतड खातो, परवडतो. शिवाय, आपण ऊसाचा खोडवा दोन वर्षे वापरतो. तसं नागेलीच्या वेलीची चुंबळ, चिंबळ ,रोप लावले तर ०४ – ०५ वर्षे चालतंय, असंही सदाशिवअप्पा लाटकर म्हणाले.