मनुस्मृतीची राख केली

जातीयवादी मनूवाद्यांची नशा
माझ्या भीमाने क्षणात उतरवली,
जहरी मनूस्मृतीचे करुन दहन
सा-या विश्वात क्रांतीची ज्योत पेटविली.

युगा-युगाचा अंधकार हा
क्षणात नष्ट केलास ‘बा-भीमा’,
करुनीया राख मनूस्मृतीची
अवघी धरती प्रकाशमय केलास ‘बा-भीमा.

ते साखळदंडही तुटले
अन् तो जुलमी फासही सुटला,
माझ्या भीमाच्या ‘त्या’ निर्णयाने
एक दैदिप्यमान इतिहास रचला.

©मनूस्मृती दहन दिन आणि स्रीमुक्ती दिनाच्या काव्यांजली परिवाराकडून शुभेच्छा©

®कवी,
आत्माराम गरुडे
दिग्रसकर.
भ्रमणध्वनी,
९३५६५७८४७४.
@काव्यांजली@

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *