कंधार शहरातील वॉर्ड क्र 2 सुलतानपुरा येथे विद्युत खांब बसविण्याची एम आय एम ची मागणी

कंधार प्रतिनिधी

कंधार शहरातील वॉर्ड क्र 2 सुलतानपुरा मध्ये चौक असलेल्या अफजल किराणा दुकाना जवळ पहिला पोल व दुसरा पोल नितीन नागोराव सूर्य यांच्या घराच्या बाजूला असे तीन नवे पोल बसविण्यात यावे आणि मगदूम भाई तसेच गोविंद नागलवड यांच्या घरामधील विद्युत खांब असून सदरील खांबामुळे त्यांच्या घरात विद्युत प्रवाह उतरत आहे

त्यामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तरीही मे साहेबांनी यांची गांभीर्य लक्षात घेत तातडीने सहकार्य करावे अशी मागणी एम आय एम चे कंधार तालुका अध्यक्ष मो हामेदोद्दिन यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *