नवी मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तब्बल 67 बालकामगारांची सुटका करण्यात आली होती. नवी मुंबई आणि कामगार उपआयुक्तांनी तळोजामध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत 60 अल्पवयीन मुली आणि 7 मुलांची सुटका करण्यात आलीय. तळोजाच्या ‘सी फूड प्रायवेट लिमिटेड कोल्ड स्टोरेज’वर हा छापा टाकण्यात आला होता.
इथून सुटका करण्यात आलेली सर्व अल्पवयीन मुलं आसाम आणि अन्य राज्यातली असल्याचं समोर येतंय. या मुलांचं शोषण केलं जात असल्याची तक्रार रेस्क्यू मिशन संस्थेनं केली होती, त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, असं रेस्क्यू मिशन संस्थेचे पदाधिकारी जेम्स वर्गीस यांनी माहिती दिलीय.
या सर्व मुलांना दिवसात 14 तासांपेक्षा जास्त राबवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह आणखी एकाला अटक करण्यात आलीय. खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजरे यांनी ही कारवाई केली.
दारिद्र्य तसेच भटकंतीमुळे शाळेकडे पाठ फिरविलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी विटामध्ये आश्रय घेतला. आई-वडिलांनी घेतलेली पैशाची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार मालकांकडे राबत आहेत. शहरातील चायनीज पदार्थ, पाणीपुरीचे गाडे, बेकरी, चहा टपरी, बांधकाम, तसेच भंगार व्यवसायासह अन्य ठिकाणी त्यांचा सर्रास वापर होत आहे.
विटा शहरात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार, बेकरी उत्पादनात राजस्थान, गुजराती, उडपी, तसेच सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली, तर बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार राबत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर, तर काही बालकामगार केवळ दोनवेळचे जेवण व राहण्याची सोय होत असल्याने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी बालकामगार आपापल्या राज्यातून आणले आहेत.
या बालकामगारांना रात्रंदिवस कामात जुंपले जात असल्याचे समजते. या चिमुरड्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत आहे. परप्रांतातून आणताना त्यांच्या पालकांच्या हातावर वर्षाचे केवळ पाच-दहा हजार रुपये एकरकमी ठेवले जातात. त्यामुळे त्यांचे मालक कामगारांची खरेदी केल्यासारखी वागणूक या चिमुरड्यांना देत असतात.
या बालकामगारांना बेकरी उत्पादन तयार करताना आगीच्या भट्टीसमोर, सुवर्णालंकार बनविताना अॅसिडच्या धुरात काम करावे लागते. भंगार जमा करताना लोखंडी साहित्याची वाहतूक करणे, चायनीज, पाणीपुरीचे हातगाडे ढकलत तासन् तास रस्त्यावर उभे राहणे यासह अन्य कामेही करावी लागतात. हॉटेल्स व कोल्ड्रींक्स व्यवसायातही अनेक बालकामगार राबत आहेत. सर्वाधिक बालकामगार बांधकाम व्यवसायात असल्याचे समजते. त्यांच्याकडून बांधकामाच्या मजल्यावर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा साहित्याची वाहतूक करवून घेतली जाते.
सुरत (Surat) शहरातील पुणा परिसरातून मानवी तस्करीचे (Human Trafficking) रॅकेट उघडकीस आले आहे. राजस्थान आणि सूरत पोलिसांनी दहा दिवस छापे टाकून या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच राजस्थानातील खेड्यातून कामासाठी आणलेल्या 125 हून अधिक मुलांनाही मुक्त करण्यात आले आहे. या मुलांना साडी तयार करणाऱ्या कारखान्यात जबरदस्तीने कामास ठेवले असल्याचे, प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने या मुलांना मुक्त केले आहे. राजस्थान-गुजरात सीमेवरील खेड्यातील काही दलाल या मुलांना सुरत येथे आणत असत. इथे या मुलांना साड्यांवर स्टोन लावणे, लेसपट्टी लावणे यांसारखी कामे करवली जात असत.
राजस्थान राज्य बाल संरक्षण हक्क आयोग आणि बचपन बचाओ एनजीओला, राजस्थान-गुजरात सीमेच्या खेड्यातून मानवी तस्करी करत सुरत येथे मुलांना आणल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सानाजिक संस्थांच्या मदतीने पहाटे पाच वाजता सुरतच्या सीताराम सोसायटीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना येथे 15 वर्षांपर्यंतची 132 मुले आढळली. इथे मुलांना वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. बर्याच मुलांना अगदी छोट्या खोलीत ठेवले होते. एकाच खोली राहणे, झोपणे आणि इतर क्रिया चालायच्या, त्यामुळे या लहान खोलीत प्रचंड दुर्गंधी होती. अशाच अवस्थेत मुले इथे राहत होती. (हेही वाचा: शिर्डीमधून का गायब होत आहेत लोक? मानवी तस्करी नाही, तर ‘हे’ आहे कारण; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण)
या मुलांना साड्या बनविण्याच्या कारखान्यांमध्ये काम करायला लावले जात होते. पहाटे चार वाजल्यापासून मुलांना कामाला जुंपले जात असे. बचपन बचाओ संघटनेच्या लोकांनीही या कारवाईत भाग घेतला होता. आता या मुलांना दोन बसमधून उदयपूरला आणले गेले आहे. या मुलांपैकी अनेक मुले उदयपूर जिल्ह्यातील विविध भागातील आहेत.
चहाच्या टपरीवर कपबशा धुण्यापासून हॉटेल, गॅरेज, ढाबे, किरणा मालाच्या दुकानातही बालकामगारांना राबवले जाते. सन २०१०पर्यंत बालकामगारमुक्त महाराष्ट्राचे ध्येय सरकारने ठेवले होते. मात्र अद्यापही ते उद्दीष्ट पूर्ण करता आलेले नाही. मागील १३ वर्षांत कामगार विभागाने ठाणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर छापे टाकत १४२१ मुले आणि २८ मुली अशा १४४९ बालकामगारांची सुटका केली आहे. सन २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे १०२८ बालके विविध आस्थापनांमध्ये काम करताना आढळली आहेत.
नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेल कामगार आयुक्तालयाच्या मदतीने खारघर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून पाच बाल कामगारांची सुटका केली. तसेच या बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणाऱ्या चार आस्थापना चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. खारघर परिसरातील गॅरेज, हॉटेल व दुकानांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जून गरड यांना मिळाली होती. त्यानुसार गरड यांनी या आस्थापनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भोर व त्यांच्या पथकाने पनवेल कामगार आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील दुकाने निरीक्षकांसह गुरुवारी संयुक्तरित्या छापे मारले.
अकोला खडकी परिसरातील हॉटेल पूनमवर काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकामगारांची मंगळवारी दुपारी सहायक कामगार आयुक्तांच्या भरारी पथकाने २०१७ मध्ये सुटका केली. पोलिसांनी हॉटेलमालकाविरुद्ध भादंवि कलम ३७४ गुन्हा दाखल केला.
गोरक्षण रोडवरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक रमेश रामाजी बोरकर(५६) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी ते भरारी पथकासह शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, चहा टपरींची तपासणी करीत असताना, त्यांच्या पथकाला खडकी येथील हॉटेल पूनम येथे दोन अल्पवयीन बालकामगार काम करताना दिसून आले. त्यांनी बालकामगारांना ताब्यात घेतले. हॉटेलमालक राधेकिसन रणजित गुजर(३0, रा. कोळडी जि. भिलवाडा, राजस्थान) याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हॉटेल मालक राधेकिसन गुजर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७४, बालकामगार अधिनियम १९८६ नुसार गुन्हा दाखल केला. बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपरीवर अल्पवयीन मुले काम करताना दिसून येतात. त्यामुळे बालकामगारविरोधी पथकाने शहरातील हॉटेलांवर छापे घालून इतरही बालकामगारांची सुटका करावी, अशी मागणी होत होती.
रबाळे एमआयडीसी परिसरातील विविध हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 7 बाल कामगारांची नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सुटका केली. रबाळे परिसरातील अनेक हॉटेलमध्ये लहान मुलांकडून साफसफाई, भांडी धुणे, वेटरचे काम करणे, टेबल सफाई आणि इतर कामे करून घेतली जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापे एमआयडीसीमधील साई सागर, प्रितम टी आणि एकवीरा या हॉटेलवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी सात लहान मुले या हॉटेलांमध्ये काम करीत असल्याचे आढळून आले. यापैकी 5 मुले ही उत्तर प्रदेश तर एक बालक नेपाळ आणि एक झारखंड येथील रहिवासी आहे. या मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून बालकल्याण समितीमार्फत रितसर त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
याप्रकरणी हॉटेलचे मालक कांचन चौधरी, निर्मला पाटील, प्रकाश परब आदीविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालकामगार अधिनियम 1986 चे कलम 3 व 3 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
सरकारने बालमजुरीच्या विरोधात कठोर कायदा तर केलाय मात्र त्या कायद्याची कुठेही अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र दिसून येते. यातच वसईतील छोट्या कंपन्यांमध्ये बाल कामगारांची संख्या जास्त असून बालपण हिरावून हे बाल कामगार म्हणून या ठिकाणी काम करत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे.
मात्र या बालमजुरी विरोधात कामगार आयुक्तांनी धडक कारवाई करत धानीवबाग परिसरातील छोट्या कंपन्यांमधील जवळ-जवळ २३ बालकामगारांची सुटका केली आहे. ही सदर कारवाई स्थानिक वालीव पोलीस आणि बालबचाव आंदोलन संघटनेने संयुक्तपणे केली आहे. ही आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ कंपन्यांच्या मालकांना ताब्यात घेतले होते.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही उपहारगृहे,विटभट्ट्या, बांधकामे, शेती,दुकाने सर्वत्र बालमजूर आहेत 14 वर्षांखालील मुलांना गरीबीमुळे अनेक पालक शाळे ऐवजी कामावर पाठवतात . या विषयाचा अभ्यास करून श्रीदेवी पाटील यांनी हाटेल मालक ,मुलांचे पालक यांचे समुपदेशन करून 51 बालमजुराची सुटका केल्याने अनेक मुले शाळेत जात आहेत.
बालकामगार या अनिष्ठ प्रथेतून गत दोन आठवड्यापासून नवी मुंबई व पनवेल परिसरातून जवळपास 8 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेल कामगार आयुक्तालयाच्या मदतीने नुकतेच खारघरमधूनही पाच बालकामगारांची सुटका केली आहे. कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन राबवून घेणार्या चार आस्थापना चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
खारघर परिसरातील गॅरेज, हॉटेल व दुकानांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जून गरड यांना मिळाली होती. त्यानुसार गरड यांनी या आस्थापनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भोर व त्यांच्या पथकाने पनवेल कामगार आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील दुकाने निरीक्षकांसह गुरुवारी संयुक्तरित्या छापे मारले. या कारवाईत पथकाने दुपारी खारघर सेक्टर-35मधील आर. के. ऑटो पार्ट्स या गॅरेजवर छापा मारून त्या ठिकाणी कामाला असलेल्या 16 व 17 वयोगटातील दोन मुलांची सुटका केली. या गॅरेजचा चालकाने दोन्ही अल्पवयीन मुलांना मागील महिनाभरापासून तीन हजार रुपये इतक्या कमी वेतनात गॅरेजमध्ये कामाला ठेवल्याचे तसेच त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करून घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने खारघर सेक्टर-3मधील फिरोज ऑटो गॅरेजवर छापा मारून त्याठिकाणी कामास असलेल्या 15 वर्षीय मुलाची सुटका केली. या गॅरेजचा मालकाने मुलाला वेतनाऐवजी खाण्यास व राहण्यास देऊन आपल्या गॅरेजमध्ये कामाला ठेवल्याचे तसेच त्याच्याकडून अतिश्रम असलेली सर्व प्रकारची कामे करून घेत असल्याचे आढळून आले. खारघर सेक्टर-4मधील सुपर चिकन एग्ज सेंटरवर छापा मारून त्या ठिकाणावरून 15 वर्षीय मुलाची सुटका केली. या एग्ज सेंटरचा मालकाने अल्पवयीन मुलाला मागील दोन महिन्यांपासून । हजार रुपयांमध्ये कामाला ठेवल्याचे तसेच त्याच्याकडून अतिश्रमाचे काम करवून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खारघर सेक्टर-12मधील शिव भोजनालयावर छापा टाकून 16 वर्षीय मुलाची सुटका केली.
गंगाधर ढवळे ,संपादकीय
२७.१२.२०