नांदेड ; प्रतिनिधी
येथिल हुतात्मास्मारक परीसरात सन 2017 मध्ये जिल्हा समन्वय समीतीच्या 75 लाख रुपये निधीतुन उद्यान निर्मिती करण्यात आली आहे.या उद्यानास हुतात्म्याचे नाव देण्या ऐवजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वडीलांचे नाव कै शांतिदुत गोविंदराव पा.चिखलीकर उद्यान असे देण्यात आले आहे.
सदरील नाव हटवून तालुक्यातील कोणत्याही शहीदाचे नाव या नगरपालीकेच्या उद्यानाला द्यावे अशी मागणी दि.28 डिसेंबर रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतिने पालीका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कंधार तालुक्यातील हुतात्म्याच्या स्मृती आठवणीत राहेवे या साठी माणिकराव काळे यांनी हुतात्मा स्मारक बांधण्यासाठी जागा दान केली आहे.या भव्य जागेत 2017 साली हुतात्मा स्मारक बाधण्यात आले .परंतु विशेष बाब म्हणजे या उद्यानास हुतात्म्याचे नाव देण्या ऐवजी शांतिदुत गोविंदराव पा.चिखलीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
हे नाव त्वरीत काढण्याचा ठराव घेऊन 69 हुतात्म्या पैकी कोणत्याही एका हुतात्म्याचे नाव या उद्यानास द्यावे अन्यथा नगर पालिके समोर बोंबल्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या निवेदनावर माजी सैनिक जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,पोचीराम वाघमारे ,आर्जुन कांबळे,गोंविद सुर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत.