नांदेड – शहरानजीक असलेल्या वाडी. बु. परिसरातील आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘फिट इंडिया’ या सप्ताहाचा नुकताच समारोप करण्यात आला. यात योगासनाच्या कवायती, बौद्धिक खेळ, आहारविषयक मार्गदर्शन, आॅनलाईन चाचणी परीक्षा, विविध शारीरिक व्यायाम आदी कार्यक्रम घेण्यात आले.
गेल्या आठवड्यातील २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या फीट इंडिया या सप्ताहाचा अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. प्रत्येक दिवशी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी स्काऊट जिल्हा संघटक दिगांबर करडे व प्राचार्या उषा कोडगिरे यांनी सप्ताहाचे उद्घाटन केले. दुसऱ्या दिवशी योगासनाच्या कवायती घेण्यात आल्या. २३ रोजी बौद्धिक खेळांचा सराव तर २४ डिसेंबर रोजी आहारतज्ज्ञ डॉ. श्वेता अवधिया यांनी आजच्या मुलांनी काय खावे, काय खाऊ नये याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची क्रीडाप्रकारातील आॅनलाईन बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. शेवटच्या दिवशी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने स्वत:च्या घरी विविध शारीरिक व्यायाम, कवायती व क्रीडाप्रकार केले.
फीट इंडिया या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी पालक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. सदरील कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपन्न झाला. नियोजन व सादरीकरण शाळेतील सर्व क्रीडाशिक्षक यांनी केले. तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.