कंधार ;प्रतिनिधी
कंधार शहर ऐतिहासिक व धार्मिक शहर आहे त्यामुळे दररोज पर्यटकांची व भाविकांची मोठी वर्दळ असते मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी-चारचाकी वाहतूक करणारे वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने उभी करतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याची मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यक्रते परशुराम केंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच परिणामी रस्त्यावर चालणार्या पादचारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिलांना तारेवरची कसरत करून हा रस्ता पार करावा लागतो. आठवडी बाजार दिवशी या परिसरात सर्वांचीच वाहने रस्त्यावर लावली जातात शहरातील शिवाजी चौक महारणाप्रताप चौक बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या ठिकाणी खाजगी वाहन चालक बेधडकपणे वाहन मिळेल त्या जागेवर लावतात तरी पोलीस अधीक्षक व्ही.व्ही.बोगाडे यांनी निवेदन चा विचार करून दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना शिस्त लावण्यात यावी अशी विनंती परशुराम केंद्रे यांनी केली आहे.