कंधार तालुक्यातील 97 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दिनांक 29 डिसेंबर पर्यंत 1020 आवेदन पत्र दाखल – तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहीती.

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तालुक्यातील 97 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दिनांक 29 डिसेंबर पर्यंत 1020 आवेदन पत्र दाखल – तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहीती.कंधार तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याच्या 7 व्या दिवशी दिनांक 29 डिसेंबर रोजी एकूण 1020 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सदरील माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याचा कार्यक्रम दिनांक 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत होता परंतु ऑनलाईन माहिती भरून ऑफलाईन द्यायचे कागदपत्र द्यायचे असल्याने सदर प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता .त्यामुळे दिनांक 29 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने यामध्ये बदत करत ऑफलाइन आणि ऑनलाईन माहिती भरण्याबाबत सवलत दिनांक 30 डिसेंबर रोजी 5.30 वाजेपर्यंत वेळ दिला असल्याची माहिती यावेळी तहसीलदार मुंडे यांनी दिली आहे.

तर निवडणूक नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांनी सदरील निवडणूक काळात दि.२३ डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरणे चालु असून दि.२३ डिसेंबर रोजी निरंक,दि.२४ रोजी १२ आवेदन पत्र,दि.२८ डिसेंबर रोजी २८६आवेदन पत्र आणि आज दि.२९ डिसेंबर रोजी ७२२ असे एकुण सुमारे 1020 आवेदन पत्र प्राप्त झाले आसल्याची माहीती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *