काँग्रेसचेपं.स. गटनेते श्रीनिवास मोरे यांची मागणी
लोहा / प्रतिनिधी
ग्राम पंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांना स्वतंत्र बॅंक खाते काढण्यासाठी बॅंकांनी पॅनकार्डची अट रद्द करावी लोकशाही मजबूत करण्यासाठी बॅंक खात्याची तात्काळ व्यवस्था करावी व आॅनलाईन नामांकनपत्र भरण्यासाठी निवडणूक विभागाचे सर्व्हर चालत नसल्यामुळे आॅफलाईन अर्ज स्विकारावे व नामांकनपत्र भरण्यासाठी तीन दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे यांनी केली आहे.
सद्या लोहा तालुक्यात ८४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून उमेदवाराना निवडणुकीत खर्च करण्यासाठी व हिशोब दाखविण्यासाठी स्वतंत्र बँक खाते काढून त्यातून दैनंदिन खर्च करायची अट निवडणूक विभागाने घातली आहे त्यामुळे उमेदवारांना स्वतंत्र बँक खात्याची अत्यंत आवश्यकता आहे परंतु लोहा तालुक्यातील बँका या निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते काढण्यासाठी पॅनकार्ड मागत आहेत बँक खाते काढण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता नाही या अगोदर विना पॅनकार्डचे बँक खाते काढलेले आहेत .सध्या 31 डिसेंबर पर्यंत पॅनकार्ड रिनो करायची तारीख आहे त्यामुळे ऑनलाईन पॅनकार्ड काढण्यासाठी पॅनकार्डची आॅनलाईन साईट चालत नाहीत जास्त लोड येत आहेत .
ग्रामपंचायत निवडणूक इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारासाठी बँकांनी तात्काळ स्वतंत्र बँक खाते काढून द्यावे याकडे जिल्हाधिकारी व वरिष्ठांनी बॅंक अधिकाऱ्याने तात्काळ लक्ष द्यावे निवडणूक बँक खाते काढण्यासाठी पॅन कार्डची पावती गृहित धरावी ४ तारखे पर्यंत तरी मुदतवाढ द्यावी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाला निवडणूक लढण्याची संधी द्यावी लोकशाही मजबूत करण्यासाठी बॅंक खात्यासाठी पॅनकार्डची अट रद्द करावी व तसेच निवडणूक विभागाचे ऑनलाइन नामांकनपत्र भरण्याचे सर्वर चालत नसल्यामुळे तीन दिवस निवडणूक विभागाने नामांकन पत्र भरण्याची मुदत ही वाढवावी अशी मागणी लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे यांनी केली आहे.