कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे हे दिनांक 28 रोजी कंधार येथे दौऱ्यावर आले असता त्यांचा कंधार शहर राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी सत्कार केला. निलेश मोरे हे कंधार येथे पूर्वी प्रशिक्षणार्थी पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे .
दिनांक 28 रोजी ते कंधार येथे आले होते. नुकतीच 19 ते 20 लाखाची चोरी झाली होती .त्या अनुषंगाने ते आले असता राजकुमार केकाटे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला .
तसेच जिल्ह्यासह कंधार तालुक्यात वाढती गुन्हेगारी, चोऱ्यांचे प्रमाण, वाहनचोरी ,मटका गुटका यासह अवैधधंद्यांना आळा घालावा अशी मागणी यावेळी राजकुमार यांनी केले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी किशोरजी कांबळे ,पोलीस निरीक्षक व्ही.व्ही बोगाडे,आदीसह पोलीस बांधवांची उपस्थिती होती.