लोहा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी सांख्यिकी रामकृष्ण पांडे यांनी आपल्या कार्यकाळात बालविकास कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट प्रसार-प्रचार केल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज वयोमानानुसार विस्ताराधिकारी पांडे हे शासकीय सेवेतून 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत एक शिस्तप्रिय सामाजिक प्रशासकीय कार्यातील उच्चशिक्षित अभ्यासू पांडे साहेब यांच्या कार्याबाबत सेवानिवृत्तीनिमित्त घेतलेला आढावा.
राम कृष्ण अंबादासराव पांडे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातील धोत्रा या गावचे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला अत्यंत शिस्तप्रिय कठीण प्रसंगात मार्ग काढणे, संयमी दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सतत कार्य हे गुण त्यांच्या अंगी आई-वडिलांकडून लहानपणी त्यांना संस्काराचे बाळकडू मिळत गेले पोत्रा या गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत त्यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे वडील अंबादास राव हे शेतकरी असले तरी त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने व गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने नांदेडला शिक्षण घेण्याचे ठरले. आठवी ते बारावी चे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल व महाविद्यालय नांदेड येथे झालेले बहिण-भाऊ रूम करून राहत असत.
B.Sc. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथे झाले. B.Sc. चे विषय Physics, Mathematics and Stat. असे होते. M.Sc. Stat, चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना खुप संघर्ष करावा लागला. अत्यंत संघर्षमय परिस्थिती सोम्यपणे, आनंदाने, हसतखेळत, तकार न करता त्यांनी उत्तम वाटचाल केली. ‘कमवा व शिका या योजनेतून काम करुन त्यांनी M.Sc. चे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यांचा मुळ स्वभाव संयमी, न्यायप्रिय, परिश्रमी व शांतताप्रिय आहे. गरीबीची जान असणारा आहे.
शासकीय सेवेस प्रारंभ
4 में 1987 रोजी DRDA (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) नांदेड येथे विस्तार अधिकारी म्हणून शिरो बजेटच्या कालावधीत नौकरी लागलो. तेव्हा कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. आई वडीलांना तर खुपच आनंद झाला. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदा बरोबरच त्यांना कामाची जबाबदारी समजत गेली. आणि अतिशय उत्साहात व संयमाने ऑफीस जबाबदारी पार पाडली. ते आपल्या कामात उत्साह वाढवत होते व त्याच बरोबर आत्मविश्वास वाढत होता.
नौकरीमध्ये कामाची जबाबदारी
विस्तार अधिकारी पांडे यांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले. नांदेड मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ऑफिसमध्ये असताना ऍडव्हान्स इन्क्रिमेंट मिळाले नेहमी ऑफिस कामासाठी दोरा करत दिल्ली मुंबईला ऑफिस कामानिमित्त जात असत.
प्रवासाची खूप आवड आहे कुटुंबांना समवेत प्रवास करण्याची खूपच आवड आहे जवळपास भारतातील पन्नास टक्के भाग बघून झाला आहे जम्मू काश्मीर, अमरनाथ, दिल्ली, म्हैसूर, बेंगलोर, कर्नाटक, गुजरात, अष्टविनायक, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर, मंजूर ,जंजिरा ,गणपतीपुळे अशा अनेक प्रेक्षणीय ठिकाणे विस्ताराधिकारी पांडे यांनी पाहिली आहेत यातून त्यांनी पर्यटनाचा अभ्यास केला आहे.
उत्कृष्ट कार्याचा गौरव सत्कार
DRDA नांदेड येथून मुखेड येथे तांत्रिक बाबींमुळे बदली झाली येथील कार्यक्रम फक्त अठरा दिवस होते परत त्यांची बदली DRDA झाली. या ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा दाखवून कार्य केले. या कार्याची दखल घेऊन स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 2002 ते 2004 उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यावर येथील पुरस्कार मिळाल व भव्य कोणत्या श्रेणीत आहे त्याविषयी वजन किती व त्यांच्या वयानुसार वजन किती असाव्यात पाहिजे याची माहिती बालका घरातील प्रत्येक व्यक्तीला होण्यासाठी बालकांचे “वज व सनियंत्रण” कार्ड केले त्यांची अंमलबजावणी केली याबाबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सभापती व सर्व समिती सदस्य यांनी कौतुक करून हे कार्ड संपूर्ण जिल्ह्यात लागू केले. घेतली होती या विशेष कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली हे उल्लेखनीय कार्य त्यांच्या काळात घडले आहे.
2014 ते 2019 साडेपाच वर्ष अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री डीपी म्हणून कार्यभार संभाळला या पदावर असताना पदाचे कर्तव्य व हक्क चोखपणे सांभाळून सर्वांना न्याय मिळवून दिला याचं काळात अतिशय उत्तम कार्यभार सांभाळून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले व सन्मान देऊन सत्कार केला व प्रशस्तीपत्र मिळाले.
शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम केले पाणी फाऊंडेशनचे काम केले याबद्दल तत्कालीन आमदार श्री चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पांडे साहेब यांचा गौरव करण्यात आला.
दरवर्षी माळेगाव यात्रा येथील उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता ग्रामीण भागातील जनतेपर्यंत बाल विकास योजना पोचविण्याचे कार्य दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रे मधून त्यांनी केले विविध पोस्टर्स बॅनर कुपोषणमुक्त बालक महिला सशक्तिकरण यासह अनेक योजना या यात्रेतून त्यांनी प्रसार आणि प्रचार करून ग्रामीण भागापर्यंत पोहोचून बाल विकास विभागाचे विशेष कार्य केले आहे.
डीआयडी या ऑफिसमध्ये पुन्हा 2006 पर्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दोन आडवास इन्क्रिमेंट मिळाले.
2007 ते 2020 पर्यंत लोह्यात उत्कृष्ट कार्य
आयसीडीएस लोहा या ऑफिसमध्ये काम करताना अंगणवाडी कामकाज पाहणी दौरा करणे कर्मचार्यांच्या अडचणी पार त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे नवीन योजनांची अंमलबजावणी करणे नवीन कल्पना व कामाचे स्वरूप कर्मचाऱ्यांना सांगून कार्य पार पाडत असत.
- वैवाहिक जीवन आणि यशस्वी कुटुंब*
दिनांक 26/6/1992 रोजी सौ.अनिता राजाभाऊ बर्दापूरकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. प्रा. रत्नाकर राजाभाऊ बर्दापूरकर अंबाजोगाई ची सासरवाडी आहे. त्यांची पत्नी खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे व्यवहारिक जीवनात अतिशय आनंदात पार पाडत असताना त्यांना कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे आई-वडील थकलेले आहेत बहीण-भावंडांची शैक्षणिक जबाबदारी व भावी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना एकूण पाच बहिणी व दोन भाऊ आहेत.
कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे व पत्नीला नोकरीची व शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे अंबाजोगाई खोलेश्वर महाविद्यालयात आजही नोकरी करताहेत श्रीरामकृष्ण पांडे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समर्थपणे तोंड देता सुयोग्य पणे उत्तर देतात व त्यातून मार्ग काढतात ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
त्यांना दोन मुले आहेत चि.ओमकार राम कृष्ण आज अमेरिकेत मध्ये California State मध्ये San Diego येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टवर कार्यरत आहे.VIT college pune येथून B.E केले व CALIFORNIA STATE मध्ये M.S करून सध्या तेथेच नोकरी करत आहे.
चि. ऋषिकेश राम कृष्ण पोत्रेकर भारती विद्यापीठ पुणे येथून बीएफ 2020 सालि First class with Distinction उत्तम रीतीने पास झाला आहे पुढील उच्च शिक्षण घेणार आहे.
कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवून प्रत्येक बालक सुदृढ झाला पाहिजे, हसता खेळता बालक झाला पाहिजे असे वाटत असे पालकांची डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करून कुपोषित बालकांची व्हीसीडीसी घेऊन त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले. 2012 साली नांदेड विभागात उत्कृष्ट कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल यशोदामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक पत्रिका तयार करणे त्यांना सन्मानाने वागणूक दिली. विस्तार अधिकारी पंडित सरांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा प्रशासनात वेगळा कार्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. आपले कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यामध्ये हे योगदान दिले प्रशासनातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते.आज ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत भावी आयुष्य त्यांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो.p
सुर सुर चैतन्याचा
रोम रोम झाले…….
अशा आनंदी विभूतिसाठी सेवानिवृत्ती
हो केवळ तांत्रिक बाब ठरते.
कारण सतत आवरत कार्यरत……
अशा उत्साह व चैतन्याचा
निर झारा श्री राम कृष्ण पांडे
साहेबराव सोनकांबळे
पत्रकार,ता.लोहा जि.नांदेड
मो.9921893325, 9421933606