मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले व अन्याय व अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रात कायदा करण्याच्या मागणीचे तहसिलदारांना निवेदन

मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले व अन्याय व अत्याचाराच्या विरोधातमहाराष्ट्रात कायदा करण्याच्या मागणीचे तहसिलदारांना निवेदन


कंधार ; साईनाथ मळगे
 धनगर समाज कंधारतालुक्यासह  महाराष्ट्रा मध्ये स्वता:चे पोट भरण्यासाठी भंटकतीकरुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या मेंढपाळ (धनगर) बांधवावर वेळोवेळी हल्ले होतआहेत. सदरिल हल्ले होत असलेल्या बाबीच्या विरोधात कायदा करण्यात यावा यासाठी दि. ०६/०८/२०२० रोजी यशवंत सेनामहाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात निवेदन देत आहेत. त्यास मौर्य प्रतिष्ठाणनांदेड व सकल धनगर समाज कंधार यांचा सुध्दा पाठींबा आहे.सदरिल हल्ले करणा-या आरोपी लोकांनाकठोरातील कठोर शासन करुन संबंधी मेंढपाळ बांधवाना न्याय देऊन संरक्षण देण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे मागणी तहसिलदार यांना करण्यात आली असून या निवेदनावर नगरसेवक विनोद पापीनवार ,सतिश देवकत्ते ,राजु बोरकर ,भास्कर तळने ,श्रीहरी मुंडकर ,ओम वाखरडे, व्यंकट शेवाळे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *