माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

 नांदेड,  

सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / विधवा व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज 10 सप्टेंबर 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य आदींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात येतो.
राष्ट्रीय पातळीवर कामगीरीसाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी निधीमध्ये आहे.
दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमध्ये येणाऱ्या पाल्यासांठी, पदवी व पदव्यूत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी गौरव पुरस्कार 10 हजार रुपये देण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *