जप्त रेतीसाठ्याचा नांदेड तहसिल कार्यालयात बुधवारी लिलाव

जप्त रेतीसाठ्याचा नांदेड तहसिल कार्यालयात बुधवारी लिलाव


नांदेड; गंगाधर ढवळे
नांदेड तालुक्यातील ईटीएस मोजणीअंती जप्त रेतीसाठा 505 ब्रासमध्ये मौ. ब्राम्हणवाडा येथे गटनंबर निहाय आहे. या रेतीसाठयाचा लिलाव नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली बुधवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे होणार आहे. नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निर्दशनास आले होते. हा रेतीसाठा जप्त करुन त्याची ईटीएस मोजणी केली आहे. संबंधितांनी हा रेतीसाठा पाहून तपासून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *