आठवणीतील विद्यार्थी :- धोंडपंत संगमाप्पा स्वामी

: आठवणीतील विद्यार्थी :01

धोंडपंत संगमाप्पा स्वामी ..

            मी १८जून १९८४ पासून माध्यमिक शिक्षक म्हणून मनोविकास विद्यालय येथे रुजू झालो . नविन नविन होतो .ओळखी फारशा नव्हत्याच . पण महिनाभरातच सर्व विद्यार्थ्यांत मी मिसळून गेलो . त्यांच्या बरोबर राहूण मला त्यांच्या आडीआडचणी त्यांचा घरची आर्थिक परिस्थिती मला कळाली . तसेच ते माझ्या सोबत राहात असल्यामुळे त्यांच्या विषयाच्या ,अभ्यासाच्या अडचणी मला ते बिनधास्तपणे विचारत . प्रकाश डांगे , प्रसाद पाठक, परमानंद व्यास ,अनिल वट्टमवार, प्रदिप कौलवार ,सुधिर शेट्टी , लक्ष्मण जायेभाये ,प्रशांत महाजन, प्रविन येन्नावार ,चंद्रकांत सांगळे, माधव ब्याळे,  दिलीप जाधव, लक्ष्मण जाधव ,उमाकांत तोटावाड ,सुमंत लाटकर , ज्ञानोबा गंदलवाड ,कृष्णा पापीणवार ,दत्ता व दिगांबर गडपल्लेवार ,सुभाष गुट्टे, व व्यंकट गीते असे कित्येक मुलं आजही मला आठवतात . मनोविकासच्या विद्यार्थींची आठवण नेहमीच मनात कोरून बसलेली आहे.

.           पण माझ्या खोलीवर बिनधास्त वावरायचं ते धोंडोपंत संगमाप्पा स्वामी . धोंडोपंत अगदी लहानसा . दिसायला सुंदर . बोलके डोळे .डोळ्यांचा रंग नकळत घारा दिसायचा .सरळ पातळ नाक ,पातळ ओठ , गव्हाळी रंगाचं हे पोरगं अतिशय चूनचूनीत होतं . आठ दहा दिवसातच तो इतका धीट बनला की तो घरातील सुपरिचीत माणसांसी वागावे तसे तो माझ्या सोबत वागायचा . तो इतका निरागस, निर्मळ व निष्पाप होता की त्याचा लळा मला कधी लागला हेच कळलं नाही . अभ्यासात जेवढा तो हुशार होता तेवढाच तो बोलण्यातही पटाईत होता . तो मला सारखे प्रश्न विचारून भडांवून सोडायचा .मी ही न कंटाळता न चीडता त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असे .मी त्याला एक तास इंग्रजी कशी बोलावी, व्याकरण व भाषेचे बारकावे सांगत असे .मी जे त्याला सांगत ते तो मन लावून ऐकत असे व प्रामाणिकपणे शिकण्याचा प्रयत्न करी . असा हा चुनचूनीत धोंडोपंत अभ्यासात ही पारंगत होता . त्याचे वडील संगमाप्पा स्वामी हे जिपमध्ये प्राथमिक शिक्षक होते .   

        पुढे चालून मी मनोविकास शाळेतून राजीनामा देवून जि प हा हदगाव येथे रुजू झालो .धोंडोपत ही बारावी पास होवून बीएएमएस ला लागला . तो नागपूर येथून त्याचं शिक्षण पूर्ण केलं . नागपूरला असताना तो मला नेहमीच पत्र पाठवायचा . त्या पत्रात ” तुम्ही इंग्रजी चांगाली शिकाविल्यामुळेच मी इथंपर्यंत आलो आहे गुरुजी .” असा नेहमीच उल्लेख करायचा .मी ही त्याच्या पत्राला नियमित उत्तर द्यायचो . त्याचं नागपूरचं शिक्षण पूर्ण झालं .नंतर मात्र धोंडोपंत मला पत्र पाठवत नव्हतं . त्याचा माझा संपर्क तूटला होता . अधूनमधून मी कंधारला गेल्यानंतर त्याच्या विषयी विचारयचो पण त्याच्या विषयी फारशी माहिती कोणालाही नव्हती .नंतर मीही हदगावहून जि प हा विष्णुपूरी येथे बदली करुन आलो होतो .विष्णूपूरीच्या विद्यार्थ्यात रमलो होतो . 

          नवव्या वर्गात मी शिकवत होतो . हसत खेळत तास चालू होतं . माझं तास म्हणजे रडतराऊत सारखं कधीच नसायचा .मी व माझे विद्यार्थी नेहमीच वर्गात आनंदी असायचो . माझा तास व वर्ग म्हणजे खळखळत वहाणारा निर्मळ झरा .मध्येच हास्याचा फवारा उडवणारा कारंज्यासारख वर्ग असायचा .मी विद्यार्थ्यांसी व विद्यार्थी माझ्यासी इतके एकरूप व्हायचे की बाहेर काय चाललय ? काय घडतंय ?याच भान ना मला नसे ना विद्यार्थीना .विद्यार्थी शांतपणे,प्रसन मनाने व हसऱ्या चेहऱ्याने मी काय सांगतोय काय शिकवितोय हे ऐकत होते . तेवढयात एक पंचविशीचा तरुण माझ्या वर्गासमोर येवून दारात उभा राहिला . समोरच्या बाकड्या वर बसलेल्या एका मुलांने मला सांगितलं , ” गुरुजी कोणीतरी आलय तुम्हाला भेटायला .” मी त्याच्याकडे पाहिलो अंधुकसं जानवलं त्याला कोठेतरी पाहिलय . चेहरा स्पष्ट आठवत नव्हतं .मी त्याच्याकडे पाहून विचार करत थांबलो . वर्गात शिकवणं ही थांबविलो . वर्ग चालू असताना तो आलेला मला अजिबात आवडलं नाही . पण तो माझ्या समोर लईच कोवळं दिसत होतं . दिसायला सुंदर होता . निष्पाप चेहरा पण त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होतं . त्याच्या चेहऱ्याकडे पाहून माझा राग कोव्हाच वितळला होता .मी त्याला विचारणार तोच मला तो म्हणाला , ” गुरुजी आत येवू का ? ” त्याची नम्रता पाहूण मी त्याला नाही म्हणू शकलो नाही .मी म्हणालो , ”ये ना बाळ . ” तो वर्गात आल्या आल्या दोन्ही हात जोडून नमस्कार केला .

दोन्ही गुडघे टेकूण माझे पाया पडला .मी आता पुरता गांगरून गेलो होतो . ” कोण असेल हा ? ” तेवढयात तो उठला . वर्गातील सर्व मुलांना नमस्कार करून मला विचारलं , ” गुरुजी ,मला ओळखलात का ? ” मी म्हणालो , ” नाही .” “गुरुजी ,तुम्ही राठोड गुरुजीच का ? ” त्याने मला प्रश्न केला .मी म्हणालो , ” होय , मी राठोड गुरुजीच पण बाळ मी तुला ओळखलो नाही ना .” ” गुरुजी मला सांगा तुम्ही कंधारला कोणाला खेळवत असत ? तुमच्या खोलीवर नेहमी कोण येत होतं ?तुम्ही कोणाचं लाड करत करत होतात ? ” त्याने प्रश्नांची सरबतीच सोडली .              हे प्रश्न विचारले की माझ्या डोक्यात पटकन प्रकाश पडला.मी म्हणालो ,” माझ्या खोलीवर धोंडोपत स्वामी हा विद्यार्थी यायचा . त्याचा मी खूप लाड करायचो .” मग तो म्हणाला , ” मग मी कोण आहे ?मीच आहे गुरूजी तुमचा लाडका विद्यार्थी धोंडोपत . ” त्याला पाहूण मला खूप आनंद झाला .मी त्याला म्हणालो , “धोंडोपंत त्यावेळी तू खूप लहाण होतास रे . आता तूझ्या चेहऱ्यात खूप फरक पडलंय बाबा . शिक्षकाच्या चेहऱ्यात फारसा फरक पडत नाही पण तूमचं वय वाढलं की चेहऱ्यात खूपच बदल होत जातो . मग मी कसा ओळखणार सांग पाहू ?” तो म्हणाला ,” होय गुरुजी ,तुमचं म्हणनं खर आहे .

.विद्यार्थ्यांचा चेहऱ्यात खूपच बदल होत जातो . ” मी म्हणालो , ” मग धोंडोपंत तू अता काय करतोय बाळ ? “धोंडोपंत आनंदाने म्हणाला , ” गुरूजी मी हे सांगण्यासाठीच आलोय .मी बीएएमएस केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली . त्या परीक्षेत मी यशस्वी झालो व पोलीस उपअधिक्षक म्हणून रुजू झालो आहे . हे केवळ तुमच्यामुळे . तुम्ही शिकविलेल्या इंग्रजी विषयामुळे . तुमची शाळेतील विद्यार्थाला लावलेली शिस्त ही कामाला आली ”            हे ऐकून मला खूप आनंद झाला . वर्गातील सर्व मुलांनी टाळ्याच्या गजरात धोंडोपंतचं स्वागत केले .धोंडोपंतनी सोबत आणलेला पेढा वर्गातील सर्व मुलांनां वाटला . माझं ही तोंड गोड केलं . असा हा गोड , सुंदर , प्रसन्न चेहऱ्याचा धोंडोपंत मुंबईला सेवा बजावत आहे .

     राठोड एम ० आर० ( गुरुजी

” गोमती सावली ” काळेश्वरनगर विष्णुपूरी

नांदेड .९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *