काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस संजयजी भोसीकर यांना राजकुमार केकाटे व मारोती मामा गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी जि .प. सदस्य महाविकास आघाडीचे नेते संजयजी भोसीकर यांच्या दिनांक 30 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे व त्यांच्या पत्नी सौ.आम्रपाली केकाटे तसेच मामा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून भव्य सत्कार करण्यात आला.

संजय भोसीकर हे तरुणाचे राजकारणात निर्भीड व सच्चे मित्र म्हणून परिचित आहेत.तसेच ते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या राजकारणाचा वसा ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या माध्यमातून आजही चालत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हारतुरे यावरील खर्च अनाथालयाला देण्याबाबत अहवाल केले होते.

तसेच कोरोणा संकट असल्याने वाढदिवस साजरा करणार नाही असेही आवाहन केल्याने होते. परंतु त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत होता.राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे व त्यांच्या पत्नी सौ.आम्रपाली केकाटे तसेच मामा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून भव्य सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *