नांदेड ; प्रतिनिधी
फिट इंडिया मोहिमेअंतर्गत आज दि.26 12 2020 रोजी इंदिरा गांधी हायस्कूल, सिडको,नांदेड येथे विविध योगासने,सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम इ.चे प्रकार स्काऊटस् आणि गाईडस् च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.एल.माचलोड,नांदेड भारत स्काऊट गाईड कार्यालयाच्या माजी जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती भागिरथी बच्चेवार,सहसचिव श्रीमती मीना झाडबुके,जिल्हा गाईड संघटक श्रीमती शिवकाशी तांडे उपस्थित होते.
या फिट इंडिया कार्यक्रमासाठी शाळेतील योगा शिक्षक,श्री एस. बी.वडजे तसेच योगा मार्गदर्शक श्री के.के.केंद्रे यांनी मार्गदर्शन केले .या प्रसंगी श्रीमती तांडे यांनी योगाचे महत्त्व आणि फिट इंडिया मोहिमेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील गाईड विभागाच्या प्रमुख गाईड कॅप्टन श्रीमती एल. वाय.कोलेवाड, स्काऊट विभागाचे प्रमुख स्काउटर श्री आर.एच.सज्जन क्रीडा शिक्षक श्री.व्ही. बी. जमदाडे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कॉउटर श्री राऊत यांनी केले.