कंधार तालुक्यातील 97 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी 1347 आवेदन पत्र दाखल ;तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहीती.

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 30 डिसेंबर रोजी एकूण 1347 अर्ज तथा नामनिर्देशनपत्र दाखल झाले असून आतापर्यंत एकुण सुमारे 2367 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सदरील माहिती संकलित करण्यात आले असल्याची माहीती तहसीलदार व्यंकटेश मुंडे व निवडणूक नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांनी दिली आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याचा कार्यक्रम दिनांक 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत होता परंतु ऑनलाईन माहिती भरून ऑफलाईन माहिती द्यायचे असल्याने सदर प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता .त्यामुळे दिनांक 29 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने यामध्ये बदत करत ऑफलाइन आणि ऑनलाईन माहिती भरण्याबाबत सवलत दिनांक 30 डिसेंबर रोजी 5.30 वाजेपर्यंत वेळ दिल्याने कंधार येथिल श्री शिवाजी हॉयस्कुल येथे जत्रेचे स्वरुप आले होते.

दि.23 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरणे चालु झाले दि.23डिसेंबर रोजी निरंक,दि.24 रोजी 12 आवेदन पत्र,दि.28 डिसेंबर रोजी 286 आवेदन पत्र आणि दि.29 डिसेंबर रोजी 722 व अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि.30 डिसेंबर रोजी 1347 असे एकुण सुमारे 2367 एवढे आवेदन पत्र प्राप्त झाले असून दि.31 डिसेंबर रोजी अर्ज छाननी मध्ये यापैकी किती वैध्य राहतील ते समजणार असल्याची माहीती निवडणूक नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *