उदगीर ; प्रा. भगवान आमलापूरे
फुलवळ ता.कंधार येथील श्री बसवेश्वर विद्यालयातील सेवनिव्रत, भाषाविषयाचे, सहशिक्षक श्री शिवाजीराव बेरळीकर सर यांचे कनिष्ठ चिरंजीव आमचे सुह्दयी वर्गमित्र सुनील शि बेरळीकर सर ,सहशिक्षक श्री समर्थ मा आणि उच्च मा विद्यालय एकुर्का रोड,ता उदगीर यांचा आज दि ०१ जाने २१ रोजी ४४ वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे सरांचा शुभ विवाह दि २८ फेब्रुवारी २१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.आम्हा समस्त वर्गमित्रांकडून सरांना नव्या वर्षाच्या आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आभाळभर शुभेच्छा. त्या मित्तभाषी आणि संयमी व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा शब्द प्रपंच.
लेखाच्या सुरुवातीलाच लाँकडाऊन नंतर तंत्रस्नेही शिक्षक मित्र, सुनील सरनी मला ओली मेजवानी दिली. विशेष म्हणजे मला एका लेखाचा विषय उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सरचे प्रारंभीच मनापासून आभार मानतो.
” महाराष्ट्राच्या माणसांची अखंड चळवळ ,” या ‘ युगसाक्षी ‘ च्या ( त्रैमासिक आणि वेब – पोर्टल ) ब्रीदवाक्याला शोभेसं काम गुरुवर्य शिवाजीराव बेरळीकर सर स्वतः करतात. कारण त्यांनी सेवानिवृत्तीनंतर भारतीय जीवन विमा निगमचे ( LIC ) काम काही दिवस केले आहे. मित्तभाषीपणा, संयम आणि कामाचा वसा सरकडे गुरुवर्य बेरळीकर गुरुजीकडूनंच ( वडिलांकडून ) आला आहे. असे म्हटले तर अतीषयोक्ती होणार नाही.
कधी सोमवारी तर कधी इतर दिवसी सर अहमदपूरच्या बसस्थानकावर बोलवून घेतात आणि मला चहा – पाणी पाजतात, लेकरांना ( धनश्री आणि यशश्री उपाख्य स्वरा ) मिठाई घेऊन देतात व घरी वापरण्यासाठी भाजीपाला घेऊन देतात. सरनी तसं काही करु नये म्हणून मी फोन आल्यावर पिशवी सोबत घेऊन जाणे बंद केलो. पण सर नवीन पिशवी विकत घेऊ लागले. लेकरांना सोबत नाही नेले तर लेकरांची आठवण काढतात. म्हणून मला एकदा वाटलं की , ‘सर सोबत एक तास ‘ हा निबंध लिहावा. एवढे मात्र खरं आहे की सर एक कुटुंब – मित्र वत्सल मित्र आहेत.
४३ व्या वर्षी सरचे लग्न जमले म्हणून काही वर्गमित्रांनी समाज माध्यमातून त्यांना ट्रोल केलं. यावर सरनी मौन पाळले. हा पण सरांचा एक संयमच होय.
तसं संयम मी पण पाळलो,पाळतोय. पण एवढा संयम पाळणे मला शक्य नाही. असं मला वाटतं. सबर का फल मीठा होता है. शिवाय संयम न पाळल्याने जे परिणाम होतात, त्यांना आज मी तोंड देत आहे.
दसऱ्याचा किस्सा आहे. नारायण व्यं मंगनाळेस ( रामा – माणिका ) दोन मुले झाली. मी फोनवर अभिनंदन करुन मग होऊ द्या एकदा खळ्ळ – खट्याक म्हणालो. समोरासमोर दिवाळीत भेटलो तेंव्हा होऊ द्या काही तरी पार्टी – बिर्टी म्हणालो. आणि आश्चर्य, प्रत्यक्षात एका दिवशी नारायणने भरलेल्या सोयाबीनच्या गाडीत कंधारला गेलो. तसं आठवणीत होता त्यांच्या दोन मलांचा आनंद. पण ही नारायणची स्वताची कमाई नाही. यात आई – वडिलांच्या कष्टाचाही वाटा आहे. तेंव्हा कुणाच्या घामावर आणि कष्टावर मी अधिकार गाजवू शकत नाही. असे मला वाटलं म्हणून मी पार्टीचे नाव काढलो नाही. बस्स एवढाच माझा संयम आहे. सर एवढा निश्चित नाही. हेच सरांचे वेगळेपण आहे.
शिवाय सर जेंव्हा पुढे येतात तेंव्हा चहा – पाण्यानंतर पुडी, बिडी, तंबाखू, मावा, गुटखा आणि मर्टेल असं काही खात नाहीत. विशेष म्हणजे इतरांना पण खाऊ देत नाहीत. त्यामुळे बऱ्याचवेळा देशपातळीवर गाजलेलं वाक्य माझ्या स्मृती पटलावर झळकून जातं. ते म्हणजे ‘ ना खाऊंगा, ना खाणे दुंगा.’म्हणून सर मला आमच्या वर्गातील नरेंद्र मोदी वाटतात.