नांदेड : प्रतिनिधी
नांदेड जिल्हासह सर्व तालुक्यात परप्रांतीय मजुरा कडुन खुप मोठ्या प्रमाणात नदीवरुन वाळु उपसा चालु आहे .नविन वर्षाच्या पूर्वसंधेला लोहा महसूल प्रशासनाने वारंवार कार्यवाही करूनही, वाळू माफियांना कार्यवाहीमुळे कुठलाच फरक पडताना दिसत नाही.लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील प्रसिध्द असलेला “कटाळा “या ठिकाणावरुन भर दिवसाढवळ्या तराफ्याच्या साह्याने गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे.
बाहेरील राज्यातून मजूर आणून तराफ्याच्या साह्याने वाळु काढणे सुरु आहे. आज झालेल्या कार्यवाही दरम्यान बेट सांगवी येथील तलाठी लक्ष्मण कांबळे यांनी स्वतः गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन वाळू माफियांचा पाठलाग केला आणि वाळू माफियांना पकडण्याचा प्रयत्न केला व पण परप्रांतीय मजुर पळुन जाण्यात यशस्वी झाले पण नांदेड जिल्ह्यात प्रथम तहा अशाप्रकारे स्वतः पाण्यामध्ये उतरुन वाळू माफियांचा पाठलाग करणारा एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तलाठी लक्ष्मण कांबळे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आज झालेल्या कार्यवाही मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत
.अशाप्रकारे स्वतः पाण्यामध्ये उतरून कार्यवाही करणारे तलाठी आम्ही पाहिले नसल्याची गावकऱ्यांमध्ये व पञकारामध्ये एक प्रकारची चर्चा आहे.अशाच प्रकारे महसूल प्रशासनाने कार्यवाही करण्याचे धाडस दाखवले तर कुठल्याही वाळू माफियांना,वाळूचा खडा हि गोदावरी नदीपात्रात बाहेर काढता येणार नाही.