नांदेड ;प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात माहे जानेवारीच्या दुसऱ्या मंगळवारी 12 जानेवारी 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 12 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.