खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपादिका सुमनताई पोलसेटपवार यांचा सत्कार.

नांदेड ; दिगांबर वाघमारे



पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी दैनिक आत्ताचा एक्सप्रेस’च्या संपादिका सुमन ताई पोलसेटवार यांचा यांचा ही सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य राम पाटील रातोळीकर माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर, प्रवीण पाटील चिखलीकर ,माजी आमदार अविनाश घाटे , चित्ररेखा गोरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सुमन ताई पोलसेटवार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला ,

यावेळी जिल्ह्यातील पत्रकार संपादक जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या सत्काराचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे तब्बल सात-आठशे पत्रकारांच्या संख्येमध्ये महिला पत्रकार म्हणून केवळ एकमेव महिला संपादिका जिल्हा प्रतिनिधी च्या स्वरूपात सुमन ताई पोलसेटवार ह्या एकमेव महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *