कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर वाढला आहे. प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पडण्याची जय्यत तयारी झाली असून 9 जानेवारी रोजी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण सुरळीतपणे कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे पार पडले असल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी दिली.
या प्रशिक्षणात केंद्राध्यक्षसह इतर अधिकाऱ्यांची जबाबदारी व ईव्हीएम मशीन हाताळणी आदी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. कंधार तालुक्यात सुमारे 82 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया ने जोर धरला आहे .
प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी जय्यत तयारी चालू आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,नायब तहसीलदार विजय चव्हाण,नायब तहसिलदार ताडेवार यांच्या नियोजनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रयत्न केले जात आहे .
त्यात प्रामुख्याने 9 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या दुसरे प्रशिक्षणातून निवडणूक कामासाठी नेमलेल्या जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून व शंकेचे निरसन करून प्रशासनामार्फत माहिती देण्यात आली .
केंद्राध्यक्ष मतदान केंद्रावर गेल्यानंतर व इतर अधिकारी निवडणुकीसाठी गेल्यानंतर सुरळीतपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील येथील कर्मचारी उत्तम जोशी, लखमावार ,मन्मत थोटे, अथर सर्वरी, नईन बेग सह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.