नांदेड ; प्रतिनिधी
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,लॉ. संजय अग्रवाल,लॉ.डॉ. विजय भारतिया या त्रिमूर्तींच्या अथक परिश्रमामुळे
लॉयन्स क्लबच्या रिजन कॉन्फरन्समध्ये लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलने तब्बल आठ पारितोषिके पटकाविली आहेत.
रिजनल चेअरमन लॉ. अनिल तोष्णीवाल यांनी गंगाधाम असर्जन येथे आयोजित केलेल्या बहारदार कॉन्फरन्समध्ये प्रांतपाल लॉ.विवेक अभ्यंकर,गट एरिया लीडर लॉ. जयेश ठक्कर, प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी,लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, प्रसिद्ध सर्प दंश चिकित्सक डॉ. दिलीप मुंडे लॉ. राहुल औसेकर, पूर्व प्रांतपाल लॉ. नारायणदासजी कलंत्री व लॉ. ॲड. प्रवीण अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. लॉयन्स परिवारातील 13 विविध क्लबनी यामध्ये सहभाग घेतला होता.
पंधरा स्पर्धां पैकी आठ स्पर्धेत नांदेड सेंट्रलच्या सदस्यांनी बाजी मारली. त्यामध्ये बेस्ट क्लब, बेस्ट बॅनर प्रेझेन्टेशन या पुरस्कारांचा समावेश आहे. लॉ. संजय अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट, लॉ. डॉ. विजय भारतीया यांना बेस्ट झोन चेअरमन या किताबाने गौरवण्यात आले. आयत्या वेळेच्या भाषण स्पर्धेमध्ये ॲड. दिलीप ठाकूर यांनी विजेतेपद मिळविले. महाराष्ट्रात गाजलेल्या लॉयन्सचा डबा या उपक्रमाला बेस्ट सिग्नेचर ऍक्टिव्हिटी तर मायेची ऊब या उपक्रमाला सर्विस ग्रोथ ऍक्टिव्हिटी पुरस्कार मिळाले. लिओ क्लब नांदेड सेंट्रलला ॲप्रिसिएशन अवार्डचा बहुमान मिळाला.
बॅनर प्रेझेन्टेशन साठी कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, नांदेड अन्नपूर्णाचे अध्यक्ष लॉ. नागेश शेट्टी, कोषाध्यक्ष लॉ. अनिल चिद्रावार,लॉ.ॲड. शैलेश पाटणूकरकर,लॉ.शिवा शिंदे,लॉ.सचिन काकाणी,
लॉ.नरसिंह ठाकूर,लॉ.सुदेश भारतीया, लॉ. कृष्णा अग्रवाल,लॉ.मधुर भंसाली, लॉ. भारत अग्रवाल,लॉ.दिलीप उत्तरवार ,लॉ. सुषमा ठाकूर,लॉ. जयश्री ठाकूर,लॉ. अनिता चिद्रावार,लॉ. विमल शेट्टी,
लॉ. स्नेहलता उत्तरवार,
लॉ. दिनेश सगरोळीकर,लॉ. आशा अग्रवाल,लॉ. ज्योती सोनी,लॉ.रामनरेश वर्मा यांचा समावेश होता. पुरस्कारासाठी महत्त्वाचे ठरलेले लॉयन्सचा डबा व मायेची ऊब हे दोन उपक्रम राबवण्यासाठी विश्वास दर्शविल्यामुळे सर्व अन्नदाते आणि ब्लॅंकेट दाते यांचे दिलीप ठाकूर यांनी आभार मानले आहे.