दैनिक दलित वाणीचे पत्रकार अनिल डोईफोडे यांचा सत्कार संपन्न


भोकर (तालुका प्रतिनिधी)

भोकर येथील चालू घडामोडी सामाजिक-राजकीय कायदेविषयक या विषयावर सडेतोड निर्भीड पत्रकारिता च्या माध्यमातून दैनिक दलित या लोकप्रिय दैनिकातून अनेक सामाजिक राजकीय सामाजिक विषयावर बातम्या प्रकाशित झाल्याबद्दल याची कुठेतरी दखल व्हावी म्हणून दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

त्याप्रसंगी विधानसभेचे सदस्य राम पाटील रातोळीकर,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राव सोनटक्के जिल्हा परिषद सदस्य प्रणिता ताई देवरे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात आला,या वेळी बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष , अहमद भाई करखेली कर,ज्येष्ठ पत्रकार ऐल ए हिरे, दैनिक तरुण भारतचे अरुण डोईफोडे, सैनिक रिपब्लिकन गार्ड अनिल जाधव, दैनिक न्याय टाइम्सचे मोहम्मद ईल्यास दैनिक वाचकमंचे चौधरी इत्यादी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *