कंधार ; प्रतिनिधी
मन्याड खोर्यात अनोखे कांहीतरी करण्याचे उगमस्थान आहे,असेच वाटते.त्यातच बहाद्दरपुरा नगरी म्हणजे अनेक चळवळ्या नानाविध मोर्चे व सत्याग्रह निर्माण केलेली नगरीत
माणिकराव पाटील.पेठकर यांच्या नातवाचा विवाह सोहळा भगवानराव पा. पेठकर यांचा मुलगा चि.बसवेश्वर यांचा विवाह आश्रोबा काशिनाथअप्पा मिटकरी यांची नात पशूपती आश्रोबा मिटकरी यांची कन्या चि.सौ.कां.प्रियंका हीस सोबत सदगुरु अदिवासी आश्रम शाळा बहाद्दरपुरा येथे पार पडला.
*वेगळा उपक्रम ;- वंदे मातरम
या सोहळ्यात एक वेगळाच उपक्रम राबविण्यात आला. या बहाद्दरपुरा नगरीची परंपरा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम गीताने होण्यासाठी स्थगन प्रस्तावाव्दारे वंदे मातरम गीताने कामकाज आरंभ झाले तिच राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाण्याची पध्दत विवाह समारंभात मन्याड खोर्यात आरंभ केली.
** ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली **
विवाह सोहळा सुरु होण्या आधी मातृभुमीला वंदे मातरम राष्ट्रीय गीतातून वंदन करुन ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
** मान्यवर **
या विवाह समारंभात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे,माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे,कंधार-लोहा तालुक्याचे शिवसेना नेते,अँड. मुक्तेश्वरराव धोंडगे,माजी जि.प.सदस्य प्रा.डाॅ.पुरुषोत्तमराव धोंडगे,माजी जि.सदस्य संजयजी भोसीकर,पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे,उत्तम चव्हाण,यांची प्रमुख उपस्थिती होती.
** पाहूण्यांना हेल्मेट भेट **
बसवेश्वर पेटकर या नवरदेवाने लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना हेल्मेट भेट म्हणून दिली. नवरदेव हा स्वतः विमा कंपनीत काम करतो, त्यामुळे हेल्मेट अभावी रस्त्यावर होणाऱ्या वाहनधारकांच्या मृत्यूची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या लग्नात वाहनधारकांना हेलमेट भेट स्वरूपात दिली. अनपेक्षितपणे नवरदेवा कडून मिळालेल्या या भेटीमुळे वर्हाडी मंडळी भारावून गेली.
**परीश्रम **
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वर पक्षांकडील वराचे काका भुजंगराव पा. पेठकर माजी सरपंच मनोहरराव पा.पेठकर,पांचाली मंडपचे सर्वेसर्वा परमेश्वर पा.पेठकर आणि छोटे काका संजय पा.पेठकर वर बंधु सिध्देश्वर पा.पेठकर विवाह सोहोळ्यात शाहीर प्रेमकुमार मस्के व सौ अनुराधाताई नांदेडकर यांचा बहारदार मनोरंजन गीतांचा कार्यक्रम झाला.
** सुत्रसंचलन **
कार्यक्रमात निवेदन माजी सरपंच माधवराव पेठकर सर व दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी उत्कृष्ट केले.
वृतलेखन – दत्तात्रय एमेकर गुरुजी
बहाद्दरपुरा ता.कंधार जि.नांदेड