शिवाजी हायस्कूल मैदानावर 22 टेबलावरून 13 फेऱ्यात होणार मतमोजणी ; तहसीलदार वेंकटेश मुंडे यांची माहिती
कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीची मतमोजणी दिनांक 18 रोजी श्री शिवाजी हायस्कूल मैदान येथे सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून सदरील मतमोजणी चे नियोजन एकुण 22 टेबलावरून 13 फेऱ्यात केले असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.
कंधार तालुक्यात 82 ग्रामपंचायतीचे दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान झाले. सुमारे 81.49 टक्के मतदान सरासरी झाली. दिनांक 17 जानेवारी रोजी दिवसभर पोस्टल मतदान व मतमोजणी च्या अनुषंगाने मार्गदर्शन तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी अधिकारी पदाधिकाऱ्यांना केले.
82 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली असून मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी देऊन मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे संपन्न होणाऱ्या मतमोजणीची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून 22 टेबलावरून 13 फेर्यांमध्ये सदरील मतमोजणी पूर्ण होणार आहे.सुरुवात बाळंतवाडी पासून होणार आहे.
तहसीलदार वेंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार सुर्यकांत ताडेवार आदीच्या नियोजनाखाली मतमोजणी पूर्ण होणार आहे.
याप्रमाणे होणार मतमोजणी
पान – 1)
पान -2)