इंधन बचतीतून आगाराचे उत्पन्न वाढीत योगदान दया-प्राचार्य डॉ. पगडे यांचे प्रतिपादन

कंधारःप्रतिनिधी

आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपलब्ध इंधनाचा योग्य वापर करावा.आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन श्री.शिवाजी कॉलेज,कंधारचे प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे यांनी आगारात आयोजित इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

कंधार आगारात दि.१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख एच.एम. ठाकूर होते.प्रमुख पाहूणे प्रा.डॉ. गंगाधर तोगरे ,डॉ. सौरभ अलडवाड यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. पगडे म्हणाले की ,इंधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आगाराच्या बसेस इंधन बचतीतून आपले उत्पन्न वाढवू शकते.त्यासाठी चालक,वाहक ,यांत्रिक कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय साधून इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे गरज आहे.जास्तीत जास्त कि.मी.प्रवास व कमी इंधन वापराचे सूत्र उपयोगात आणण्याचे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष जोगे यांनी तर आभार माधवराव तेलंग यांनी मानले.यावेळी वाहतूक निरिक्षक के.जी.केंद्रे ,आगार लेखाकार डी.के.केंद्रे ,वरिष्ठ लिपिक शेख खलील ,एस.के.मठपती ,मान्यताप्राप्त संघटनेचे भगवान चव्हाण आदीसह चालक-वाहक,यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *