आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते यांच्या हस्ते ग्रामपंचायती मध्ये विजय मिळवलेल्या पॅनलचा सत्कार
कंधार ; प्रतिनिधी
लोहा कंधार मतदारसंघातील भूकमारी,घोडज,वरवंट,जोमेगाव,कापसी ,आष्टूर,लाठ( खु.),हिंदोळा,शिरुर,लवराळ,आडगाव
येथील ग्रामपंचायतीवर आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या पॅनल चा दणदणीत विजय झाला.त्याबद्दल आज दि.20 जानेवारी रोजी यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे सह जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे,जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे उपस्थित होती.
यावेळी उपस्थित गावकाऱ्यांसोबत गावाच्या विकासाबाबत व अन्य विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व सदरील विजयी ग्रामपंचायतीसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी केले व आश्वासन दिले.यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.