कंधार ; प्रतिनिधी
दिनांक 1 एप्रिल 2015 अगोदरचे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व सन 2015 ते 2019 या कालावधीत चालू बाकीदाराची शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपये कर्ज माफीचे आश्वासन 20 जानेवारी 2020 ला दिले होते ते पूर्ण करावे तसेच मोठे कर्जदार यांनादेखील कर्जमाफीचा लाभ मिळावा व आजपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांनी घेतले नाही अशा शेतकऱ्यांनाही सरसगट 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या मागणीचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराज हरी डांगे गंगणबिडकर तालुका कंधार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दि. 20 जानेवारी 2021 रोजी केली आहे.
मराठवाडा विभागात सतत ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत असतो. दिनांक 1 एप्रिल 2015 च्या अगोदरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही तसेच तात्काळ शासनाने द्यावा व सन 2015 ते 2019 या कालावधीत चालू बाकीदार शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपये कर्ज माफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते पण पूर्ण करावे तसेच शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा .यासह मोठे कर्जदार यांना देखील शासनाने कर्जमाफी पासून वंचित ठेवले आहे .
त्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी व अद्याप ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही किंवा त्यांनी घेतले नाही अशा शेतकऱ्यांना ही 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कंधार तालुक्यातील गंगनबीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा या मागणीचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराज डांगे यांनी दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य ,आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड ,तहसीलदार कंधार यांच्यासह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.