भाजपा सोशल मिडिया प्रमुख रजत शहापुरे यांच्या वतीने कंधार तालुक्यातील पानशेवडी ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासु समर्थक राजहंस शहापुरे व भाजपा सोशल मिडिया प्रमुख रजत शहापुरे यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकत्याच पार पडलेल्या पानशेवडी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय संपादित केलेल्या उमेदवारांचा दि.20 जानेवारी रोजी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,गोलेगाव चे माजी सरपंच काशिनाथ फुले,पानशेवडी ग्रामपंचायत पँनल प्रमुख कोंडिबा पाटील मोरे, अँड.शिवाजी पाटील मोरे,माधव बसवंते,माधव पाटील मोरे,धोंडिबा पाटील मोरे,गणेश पाटील मोरे ,दत्ता पाटील शिंदे ,प्रकाश पाटील मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *