नांदेड ; प्रतिनिधी
लोकप्रिय जि.प.सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिता देवरे चिखलीकर यांनी आज दि.20 जानेवारी रोजी दिल्ली येथे केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी व रावसाहेब दानवे यांची भेट घेवून विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच महिला मोर्चा सह कंधार-लोहा मतदारसंघातील विविध रस्ते विकासकामे व संदर्भात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच ग्रामपंचायत विजयाबद्दल चर्चा केली.यावेळी त्यांच्या सोबत भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.उमाताई खापरे, दिपाली मोकाशी, रिदा राशिद,शैला मोळक आदीची उपस्थिती होती.