कंधार ( दि. 23 जानेवारी )
शिवसेनाप्रमुख साहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कंधार शहरात शिवसेनेच्या वतीने मोटार सायकल रॅली काढून बाळासाहेब ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले.
शिवसेनेचे शहर प्रमुख धनराज पाटील लुंगारे व पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली. शिवसेनेचे सर्वेसर्वा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने 23 जानेवारी रोजी. कंधार शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटार सायकल रॅली ची सुरुवात करून. महाराणा प्रतापसिंह . साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करून. अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे एड. मुक्तेश्वर धोंडगे. बाळासाहेब पाटील कराळ, विधानसभा संघटक गणेशराव कुंटेवार, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार, शहर प्रमुख धनराज पाटील लुंगारे, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, नगरसेवक अरुण बोधनकर, माजी शहर प्रमुख मारुती पंढरे, डी बी पाटील इंगोले, व्यंकटराव मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवर नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक गणेश कुंटेवार यांनी केले तर आभार शहर प्रमुख धनराज पाटील लुंगारे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू पाटील डांगे, रामदेव आदम पुरे, राजू केंद्रे, अनिल लाडेकर, सुनील, राठोड सुधाकर पवार, अजिंक्य यन्नावार, सौरभ लुंगारे, कैलास स्वामी, युवराज लुंगारे, यांनी परिश्रम घेतले.