कंधार ; दिगांबर वाघमारे
मौ.घोडज येथिल धाडसी कामेश्वर वाघमारे या बालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेवून दोघांचा जीव वाचवला हे धाडसाचे काम कामेश्वरने केले.त्याचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानीत झाला पाहीजे यासाठी मी प्रयत्न केलो त्याला यश मिळाले असुन दि.22 जानेवारी 2021 रोजी सदरील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र मिळाले असल्याची माहीती कंधार लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली.
दि.२२ फेब्रुवारी २०२० रोजी घोडज जवळ मन्याड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघापैकी दोघांचा जीव वाचवणा-या महात्मा फुले विद्यालय शेकापुर येथिल शाळेतील कामेश्वर वाघमारे या आठवी वर्गात शिकत असलेल्या मुलाने प्रसंगावधान साधून पाण्यात उडी घेऊन तिघापैकी दोघांचा प्राण वाचवले होते.
त्यामुळे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे,नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोकराव चव्हाण,अमरनाथ राजुरकर,कंधार लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर ,पोलीस निरीक्षक विकास जाधव , चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ,मारोतीमामा गायकवाड मित्रमंडळ ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार ,ग्रामपंचायत ,शाळा ,विविध सामाजिक संघटनेच्या वतिने सत्कार करुन राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्याची मागणी सर्वच स्तरावरुन करण्यात आली होती.
लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कामेश्वर वाघमारे घोडजकर यांच्या प्रत्यक्ष घरी जावून सत्कार केला.तसेच तत्कालीन कंधार तहसिलदार सखाराम मांडवगडे यांना संपर्क साधून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी लागणारी आवश्यक माहीती संकलीत केली.एवढेच नव्हे तर कामेश्वर वाघमारे यांला स्वतः घेवून मुंबई मंत्रालयात घेवून कामेश्वरच्या शौर्याचा पराक्रम सांगितला होता.
कामेश्वरच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.