श्री रामंदिर निधी समर्पण अभियानास कंधार मध्ये प्रारंभ


कंधार ; प्रतिनिधी


श्री रामजन्मभूमी आयोध्या हेथील प्रस्तावीत श्री राम मंदीर भूमिपूजन ना नंतर संपूर्ण देशभरात निधी समर्पण अभियानास 15 जानेवारी पासून सुरवात झाली त्याच अनुषणगाने कंधार येथेही निधी समर्पण अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.

अयोध्या हेथील प्रस्थावीत श्री रामा च्या जन्मभूमी स्थित भव्य अश्या राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले व मंदिर उभारणी साठी प्रत्यक नागरिकांचे योगदान लाभावे या साठी निधी समर्पन अभियान राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कंधार येथील नगरेश्वर मंदिर येथे समर्पण कार्यक्रम घेण्यात आला या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक बाबुराव गंजेवार यांनी मार्गदर्शन केले ते त्या वेळी बोलतांना म्हनालेकी हे मंदिर म्हणजे राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून जगासमोर येणार आहे.असे ते यावेळी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या यावेळी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.


15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालणार आहे देशातील प्रत्येक कुटुंबा चा सहभाग मंदिर निर्माणात खारीचा वाटा असावा व येणाऱ्या पिढीला मंदिराचा पाचशे वर्षाचा इतिहास माहिती व्हावा व समाजातील प्रत्यक घटका घरोघर जाऊन राष्ट्रभाव व समरसतेचा भाव जागृत करण्याचा उदेश या अभियानाचा आहे असे आपल्या प्रस्ताविकात अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी सांगितले. या वेळी अभियान प्रमुख कृष्णा बनसोडे ,तालुका कार्ययवाह केदार महाराज , सुमित रत्नपारखे,अड अनिल डांगे,अड अभय देशपांडे,अड मारोती पंढरे,डॉ रामभाऊ तायडे,भगवान महाराज व्यास,गोविंदराव फरकंडे,गणेश उगले,सौ जयमंगला औरादकर,सुरेखा वडवळकर,सौ देशपांडे,ईरांना पाटील भागांनगरे,अड सागर डोंगरजकर,विलास मुखेडकर,गोविंद लुंगारे,अरविंद महाराज रामदासी, पंडित ढगे, अमित सालमोटे, केदार मुत्तेपवार, सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *