कंधार ; दिगांबर वाघमारे
घोडज ता. कंधार येथिल शुरवीर विद्यार्थी कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांच्या अद्वीतीय साहसाबद्दल त्याला पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.त्या साहशी कामेश्वर याचा कंधारचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी त्याच्या घरी भेट देवून सत्कार केला.
दि.२२ फेब्रुवारी २०२० रोजी घोडज जवळ मन्याड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघापैकी दोघांचा जीव वाचवणा-या महात्मा फुले विद्यालय शेकापुर येथिल शाळेतील कामेश्वर वाघमारे या आठवी वर्गात शिकत असलेल्या मुलाने प्रसंगावधान साधून पाण्यात उडी घेऊन तिघापैकी दोघांचा प्राण वाचवले होते.या साहसा बद्दल भारत सरकारच्या वतीने दि.२२ जानेवारी रोजीच कामेश्वर वाघमारे याची पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.