भारतीय जनता पार्टी भोकर तर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा ;खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले मार्गदर्शन

भोकर ;प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार
प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टी भोकर तर्फे दि.24 जानेवारी रोजी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मेळाव्यास नांदेड भाजपा जिल्हाध्यक्ष
व्यंकटराव पाटील गोजेगावकर,माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर ,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्यदिलीप कंदकुर्ते,जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, लक्ष्मणराव ठक्करवार, श्रावण पाटील भिंलवडे महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रलेखाताई गोरे
,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुखभोकर विधानसभा अध्यक्ष निलेशभाऊ देशमुख,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष
अमोल ढगे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भोकर मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *