कंधार ; दिगांबर वाघमारे
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 25 जानेवारी रोजी कंधार नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व नगरपालिका कर्मचारी यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली.
25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यामुळे.व 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांच्या मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे या मुख्य उद्देशाने दिनांक 25 जानेवारी रोजी मतदान राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. असल्याची माहिती मुख्याधिकारी ठोंबरे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, जितेंद्र ठेवरे, स्वप्नील मोकळ, सोनाली राठोड, पडलवार मॅडम, गोविंद लुंगारे., समाधान तेनगसकर,सतीश बडवने, राहुल खोडसकर ,दत्ता आईनवाड, हरिदास कळसकर, शेख अब्दुल ,संदीप जाधव आदी सह कर्मचारी उपस्थित होते.