नांदेड ; प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कृषी विभाग नांदेड आयोजित भव्य कृषी महोत्सव व विकेल ते पिकेल या धोरणा अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री उपक्रम राबविले.कृषी महोत्सवाला आज नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समवेत मी भेट दिली. प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन शेतकऱ्यांना तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन भेटावे या उद्देशाने प्रत्येक स्टॉल वरून वस्तू खरेदी केली.
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन थेट शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत या अभिनव संकल्पनेला प्रोत्साहन दयावे असे आव्हान यावेळी बोलताना नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. यावेळी बीजेपी पक्षाचे पदाधिकारी,कृषी विभागातील कर्मचारी,शेतकरी,विक्रेते,ग्राहक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.