प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाच्या माध्यमातून लोहा कंधार मतदारसंघातील लोकांच्या सर्व समस्या मार्गी लागणार- सौ.आशाताई शिंदे

कंधार (प्रतिनिधी)

कंधार तालुक्यातील पांगरा गावात प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, कार्यक्रमाच्या उदघाटक सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे होत्या यावेळी व्यासपीठावर तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, गटविकास अधिकारी बळवंत,पं. स. सदस्य सत्यनारायण मानसपुरे उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की कंधार तालुक्यातील विविध कार्यालयाशी संबंधित कामकाजाकरिता मंडळ निहाय उपक्रम आयोजित केल्या जाणाऱ असून याची सुरुवात कंधार तालुक्यातील पांगरा गावातून आज करण्यात आली आहे, तालुक्यातील सर्व लोकांनी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा म्हणजे आपण आपल्या समस्या मांडल्या तरच समस्या या कार्यक्रमाद्वारे मार्गी लागतील असे आशाताई शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले .

या कार्यक्रमास सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने आपली प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील असे यावेळी बोलताना आशाताई शिंदे यांनी सांगितले.

प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांनी संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना,आरोग्य, शिक्षण सह विविध विभागातील समस्या या कार्यक्रमातून मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहणार असल्याचेही यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी या कार्यक्रमास माधव पाटील घोरबांड, शेख शेरू भाई ,लखन ठाकूर ,विठ्ठल कतरे, विठ्ठल टेकाळे सह गावकरी, शेतकरी ,नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य ,तथा वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी गतिमान प्रशासन राबवण्यासाठी उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *