कंधार ; प्रतिनिधी
संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह रामनाम कथा दिनांक 22 ते 29 जानेवारी दरम्यान संपन्न झाले.दि.29 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची ह. भ. प. वासुदेव महाराज शास्त्री गोपीनाथ गड परळी वैजनाथ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
यामध्ये माधव महाराज देवकते यांच्या रसाळ वाणीतून सतत सात दिवस राम कथा सादर करण्यात आली .तर ह. भ .प .वारकरी भूषण प्रेमराज महाराज आनंदवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली काल्याचे किर्तन ह. भ. प. वासुदेव महाराज शास्त्री गोपीनाथ गड परळी वैजनाथ यांनी काल्याची कीर्तन केले.या काल्याची कीर्तनाने सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी नामदेव बुवा केंद्रे, माऊली महाराज तिडके, गोपीनाथ केंद्रे आदिनी मृदंगाची साथ दिली. संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सतत सात दिवस हजेरी लावली होती. या किर्तनासाठी परिसरातील भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.किर्तनासाठी वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती.