राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उत्तर विधानसभा अध्यक्षपदी मोहम्मद दानिश यांची निवड

नांदेड ;प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटन असलेल्या विद्यार्थी काँग्रेसच्या नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्षपदी मोहम्मद दानिश मोहम्मद मजहरुउद्दिन यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुनीलजी गव्हाणे आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री प्रशांत कदम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष श्री कन्हैय्या कदम यांच्या उपस्थितीत आणि हस्ते मोहम्मद दानिश यांची नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल मोहम्मद दानिश यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ मार्गदर्शक नेत्यांचे आभार मानले. आणि भविष्यकाळात आपल्या पदाचा वापर करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करू अशी भावना व्यक्त केली या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *