कंधार ; 31 (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर या दर वर्षी आपला वाढदिवस अंगणवाडीतील कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराची पंगत देऊन कुपोषित बालका समवेत साजरा करत असतात परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे व लॉकडाउन मुळे अंगणवाड्या व प्राथमिक शाळा सध्या बंद आहेत त्यामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून ग्रामीण रुग्णालय कंधार येथील कोरोणा महामारी च्या काळात रुग्णांची सेवा केलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा मानसन्मान, व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करुन सौ.वर्षाताई भोसीकर यांनी अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसिकर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लोणीकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद फिसके, कंधार तालुका कांग्रेस चे सरचिटणीस हणमंतराव पाटील पेटकर,कृष्णभाऊ भोसीकर,प्राचार्या सौ. राजश्री शिंदे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष पदमवार,डॉ. गुडमेवार, डॉ. साई शिंदे, डॉ. येवलिकर, डॉ. वाघमारे,सचिन पाटील पेटकर,बहदरपुरा ग्रामपंचायत सदस्य सौ. कल्पना पेठकर, बालाजी तोटवाड, अवधुत पेटकर,माकन चन्नावार, किरण बडवने,किशोर आंबेकर, गोदाबाई गायकवाड़,चंद्रभागाघाबाई गायकवाड़, सुमनबाई खरात,चूउत्राबाई गायकवाड,शमी बी शेख,यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका भगिनी कंपाउंडर व नागरिक आदी उपस्थित होते.
31 जानेवारी 2013 रोजी आपल्या वाढदिवशी फुलवळ येथील अंगणवाडीतील 33 कुपोषित बालके दत्तक घेऊन सौ. वर्षाताई भोसीकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता तेव्हापासून कुपोषणमुक्तीचा त्यांनी वसा घेऊन कुपोषणमुक्ति चळवळ सरूवात केली होता दरवर्षी आपला वाढदिवस अंगणवाडीतील कुपोषित बालका समवेत पौष्टिक आहाराची पंगत देऊन त्या साजरा करतात पण सध्या अंगणवाड्या बंद असल्यामुळे वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी आज 31 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथील कोरोना महामारी च्या काळात जनतेची अहोरात्र पणे सेवा केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसन्मान व सत्कार केला व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉकटर्स व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सौ.वर्षाताई यांचा सत्कार करुण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमानिमित्त त्यांचे आभार मानले.याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई म्हणाल्या की दरवर्षी माझा वाढदिवस मी माझा वसा कुपोषणमुक्तीच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असते यावेळेस अपवादात्मक परिस्थितीमुळे वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून आपल्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार व रुग्णांना फळ वाटप करताना मला आज अत्यंत मनस्वी आनंद होत आहे. भोसीकर कुटम्बीयांच्या वतीने कोरोना च्या लॉकडाउन काळात अनेक बेरोजगार कुटुंबाना अन्न धान्य भाजी पाला वाटप कंधार व परिसरातील लोकना केले.कंधार सहर व आरोग्य कर्मचारि नागरिकांना मास्क व सेनेटाइजर आदी वाटप केले आहे. रुग्णांना आपले दैवत मानून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करावी ,तुमच्या भावी कार्यास मी शुभेच्छा देते यापुढील देखील माझे वाढदिवस माझ्या कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाने साजरे होतील असेही सौ.वर्षाताई म्हणाल्या.या प्रसंगी डॉ. संतोष पदमवार डॉ. गुडमेवार यांनी आपले विचार मांडले व आभार व्यक्त केले.