कंधार ; प्रतिनिधी
शहरात नुकतेच शॉकसर्कीटने आग लागून 7 दुकाने जळाली होती .त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले ही बाब येते शासकीय गुतेदार वैजनाथ सादलापुरे यांना समजताच कंधार येथे दि.३० जानेवारी एका खाजगी कार्यक्रमात बोलवून सातही दुकानदारांना प्रत्येकी 5000 रुपये प्रमाते सुमारे 35 हजार रुपये मदत करुन मानुसकीचा धर्म पाळला आहे.
दि. ३० जानेवारी रोजी हिंदवि बाणा लाईव्ह व कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाणच्या वतीने संपादक माधव भालेराव यांनी आयोजित केलेल्या पत्रकाराच्या कार्यक्रमात उमरज संस्थानचे मठाधिपती एकनाथ नामदेव महाराज हे उदघाटक तर ,शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हो आणि प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, एकनाथ मोरे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार,पंढरीनाथ बोकारे नायब तहसीलदार विजय चव्हाण, श्याम पाटील तेलंग यांच्या उपस्थितीत वैजनाथ सादलापुरे यांनी आपली बांधिलकी जपत शहरात जळून खाक झालेल्या सात दुकान मालकांना प्रत्येकी पांच हजार रूपये मदत करून एक वेगळेच माणुसकीचे दर्शन घडविले.